दि. 24 मे 2024
गडचिरोली : अल्पवयीन असल्याचा माओवाद्यांचा दावा ठरला खोटा.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : अबुझमाड परिसरातील बिनागुंडा येथून 20 मे रोजी ताब्यात घेतलेल्या एकूण पाच माओवाद्यांपैकी दोन माओवाद्यांनी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता आलेल्या रिपोर्टनुसार दोन्ही माओवादी हे अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांना 23 मे रोजी अटक करण्यात आली आहे..
प्लाटून सदस्य राधिका बुचन्ना मडावी (32), रा. नेंडरा (छत्तीसगड), प्लाटून सदस्य पोडिया आयतू कुंजाम (32), रा. मरतूर (छत्तीसगड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राधिका व पोडिया यांनी अल्पवयीन असल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. वयाबाबत चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांचे वय 32 वर्षे असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीर अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचे समक्ष हजर केले असता दोन्ही माओवाद्यांस चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर झाली आहे.
Gadchiroli: Maoist's claim that he is a minor is false.
#गडचिरोली #gadchiroli #MediaVNI