दि. 26 मे 2025
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक ३० मे रोजी; अपघात नियंत्रणासाठी नागरिकांचे अभिप्राय आमंत्रित.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली येथे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक ३० मे २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सखोल चर्चा केली जाईल. नागरिकांच्या सहभागातून अधिक सुरक्षित आणि परिणामकारक रस्ता सुरक्षा उपाययोजना ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना या बैठकीत सहभागी होऊन आपले अभिप्राय आणि सूचना मांडण्याचे आवाहन केले आहे.
बैठकीचा उद्देश आणि चर्चेचे मुद्दे
जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष पंडा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत, अपघातग्रस्त ठिकाणांची ओळख पटवणे, संभाव्य धोके, जनजागृतीचे उपाय आणि त्यांची अंमलबजावणी यावर विस्तृत चर्चा केली जाईल. रस्त्यावरील सुरक्षेबाबत आपले अनुभव, सूचना आणि समस्या मांडू इच्छिणारे नागरिक, संस्था, तसेच शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांनी या बैठकीत आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी केले आहे.
District Road Safety Committee meeting on May 30; Citizen feedback invited for accident control.!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI