दि. 16 मे 2025
जिल्हा परिषदेच्या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका : मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : "जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सरळ सेवा व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही शासन निर्णयानुसार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने व प्रामाणिकपणे राबवली जात असून, उमेदवारांनी कोणत्याही दलाल, मध्यस्थ अथवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये," असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती व बदली प्रक्रियेद्वारे भरण्यात येतात. त्याचप्रमाणे, अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतिक्षा सुचित उमेदवारांना आवश्यक दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, संवर्गातील उपलब्ध जागा व ज्येष्ठतेनुसार पारदर्शक समुपदेशनाद्वारे नियुक्त्या दिल्या जातात, असे श्री सुहास गाडे यांनी कळविले आहे.
Do not fall prey to any temptation in Zilla Parishad recruitment process: Chief Executive Officer Suhas Gade appeals.!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI #ZP #job