दि. 22 जून 2025
एलएमईएल ने साजरा केला ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस.!
1. सुरजागड लोहखनिज खाणीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी योगासन करताना.
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली /कोनसरी : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने शनिवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज खाणी आणि कोनसरी येथील प्रकल्पात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ५०० हुन अधिक जणांनी आंतरराष्ट्रीय योग्य दिवसाच्या कार्यक्रमांत उत्साहाने सहभाग नोंदवला.
सकाळपासूनच वातावरणात आंतरराष्ट्रीय योग्य दिवसाबद्दल उत्साह होता. सुरजागड लोहखनिज खाणीमध्ये अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि जवळपासच्या गावातील रहिवाशांनी सामूहिक योग सत्रात भाग घेतला. कोनसरी प्रकल्पात देखील एलएमईएल ने योग सत्राचे आयोजन केले होते ज्यामध्ये अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ग्रामस्थांसह मुला-मुलींनी देखील उत्साहाने भाग घेतला.
योग सत्रांत सहभागी झालेल्यांसाठी दिलेल्या संदेशात, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व आणि या वर्षीच्या 'एक पृथ्वी, एक आरोग्य योगासह' या संकल्पनेवर प्रकाश टाकला. "योग ही भारताची जगाला देणगी आहे. एलएमईएलला आज या जागतिक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उत्सवात सहभाग नोंदवण्याचा अभिमान आहे. कर्मचारी आणि स्थानिक समुदायांना निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या योगासह इतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता एलएमईएल अधोरेखित करते," असे त्यांनी पुढे सांगितले.
ह्याप्रसंगी, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या सगळ्यांना एलएमईएल तर्फे अल्पोपहार आणि कॅप देण्यात आले.
LMEL celebrated the 11th International Yoga Day!
#LLOYDS #Gadchiroli #MediaVNI #गडचिरोली