दि. 16 जून 2025
अवैधपणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात अवैध अंमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. याच पाश्र्वभुमीवर काल दिनांक 15 जून 2025 रोजी गडचिरोली पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून गडचिरोली शहरात मोटार सायकलवर फिरून गडचिरोली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, इसम नामे सागर कवडू बावणे, वय 25 वर्ष रा. कोटगल ता. जि. गडचिरोली हा शहरात अवैद्यपणे अंमली पदार्थाची विक्री करत असल्याच्या गोपनिय माहितीवरून पोस्टे गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी शासकीय पंचांसमक्ष आरोपी सागर कवडू बावणे वय 25 वर्ष रा. कोटगल ता. जि. गडचिरोली यांचे ताब्यातील वाहन व राहते घराची घरझडती केली असता त्याचे ताब्यात रु. 13,800 किंमतीचा गांजा (कॅनाबीलीस) वनस्पतीचे फुले, 01 मोटारसायकल अंदाजे किंमत रु. 75,000 असे एकुण रक्कम रु. 90,705 किंमतीचा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचे विरुध्द गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करुन आरोपी सागर कवडू बावणे वय 25 वर्ष रा. कोटगल ता. जि. गडचिरोली याला आज रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोस्टे गडचिरोलीचे पोउपनि दिपक चव्हाण हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखालीे पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिपक चव्हाण, पोउपनि चैतन्य काटकर व अंमलदार यांनी केलेली आहे. गडचिरोली पोलीसांनी अमली पदार्थ विक्री करणाया, बाळगणारे व सेवन करणायांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
Gadchiroli police arrested the accused for illegally selling drugs!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI