सामान्य जनतेला विनाकारण त्रास ; पोलीस शिपायाची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सामान्य जनतेला विनाकारण त्रास ; पोलीस शिपायाची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी.!

दि. 21 जून 2025
MEDIA VNI 
सामान्य जनतेला विनाकारण त्रास ; पोलीस शिपायाची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी.! 
- वेलतूर तुकूमचे उपसरपंच दिगांबर धानोरकर यांचे खासदारांना निवेदन ; रेती वाहतुकीतून अवैध वसुली आणि दारू विक्रेत्यांशी संबंधांमुळे जनतेला त्रास होत असल्याचा दावा.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : चामोर्शी पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई सरजन चव्हाण यांच्यावर सामान्य जनतेला नाहक त्रास दिल्याचा आणि अवैध वसुली केल्याचा गंभीर आरोप करत, त्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ग्राम संवाद सरपंच असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष तथा वेलतूर तुकूमचे उपसरपंच दिगांबर काशिनाथ धानोरकर, व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर शेडमाके यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडे केली आहे. धानोरकर यांनी याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांनाही दिले आहे.
दिगांबर धानोरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील गोरगरीब घरकुल धारकांसाठी शून्य रॉयल्टी या शासन निर्णयानुसार रेती वाहतूक सुरू असताना, चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस शिपाई सरजन चव्हाण हे ट्रॅक्टर मालकांना नाहक त्रास देतात. त्यांच्या या कृतीमुळे चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक घरकुल धारकांची कामे रेतीच्या अभावी अपूर्ण राहिली आहेत.
प्रत्येक ट्रॅक्टर मालकाकडून प्रति गाडी २०,००० रुपये (वीस हजार रुपये) मागितले जातात. पैसे न दिल्यास, शून्य रॉयल्टी असली तरी गाडी पोलीस स्टेशनला लावून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. जो गरीब ट्रॅक्टर मालक पैसे देत नाही, त्याचा ट्रॅक्टर पकडून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात किंवा ५०,००० रुपये (पन्नास हजार रुपये) मागितले जातात. गेल्या चार महिन्यांत सरजन चव्हाण यांनी ८ ते १० लाख रुपयांची अवैध माया जमवल्याचा आरोपही धानोरकर यांनी केला आहे.
निवेदनानुसार, पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई सरजन चव्हाण यांचे चामोर्शी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व दारू विक्रेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून ट्रॅक्टर मालकांचे ट्रॅक्टर अडवून त्यांना बोलावून पैशाची वसुली केली जाते. यांच्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील ट्रॅक्टर मालक गरजू घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून देऊ शकले नाहीत, त्यामुळे ७०% घरकुलांची कामे अपूर्ण असल्याचा दावाही धानोरकर यांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांच्यावर कायदेशीर व योग्य चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी धानोरकर यांनी केली आहे.
Unnecessary harassment of the general public; Demand to investigate and suspend the police constable.!
#गडचिरोली  #Gadchiroli #Maharashtra #chamorshi #MediaVNI


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->