मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे महाराष्ट्रातील मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे महाराष्ट्रातील मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी.!


दि. 22 जुलै 2025
MEDIA VNI 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे महाराष्ट्रातील मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी.!
पुढील पाच वर्षांत, गडचिरोली राज्यातील टॉप-१० जिल्ह्यांमध्ये असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
● कोनसरी येथे लॉयड्स मेटल्सचा ४ एमटीपीए पेलेट प्लांट आणि ८५ किमी स्लरी पाइपलाइनचे उद्घाटन.
● सोमनपल्ली येथे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान, रुग्णालय आणि सीबीएसई-संलग्न शाळेची पायाभरणी.
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली/कोनसरी :“लॉयड्स मेटल्सने जिल्ह्यात औद्योगिकीकरण सुरू केल्यापासून गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक परिवर्तन होत आहे. ज्या वेगाने सकारात्मक बदल होत आहेत, त्यामुळे पुढील पाच वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील टॉप-१० जिल्ह्यांमध्ये उदयास येईल. ४.५ एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी ही त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे,” असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मंगळवारी कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने आयोजित केलेल्या भव्य समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार मिलिंद नरोटे, आमदार डॉ. परिणय फुके, लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, पोलीस महानिरीक्षक (नक्षलवादविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हाधिकारी श्री.अविष्यंत पांडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, ‘पद्मश्री’ सुश्री. तुलसी मुंडा, रमेश बारसागडे, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार आदींनी सहभाग घेतला.
एलएमईएल स्टील प्लांटची पायाभरणी करण्याव्यतिरिक्त, श्री. फडणवीस यांनी कोनसरी येथे एलएमईएलच्या ४ एमटीपीए पेलेट प्रकल्पाचे, ८५ किमी स्लरी पाइपलाइनचे, आणि हेडरी येथील लोहखनिज ग्राइंडिंग युनिटचे ई-उद्घाटन केले. त्यांनी सोमनपल्ली वसाहत, आणि कोनसरी येथील प्रस्तावित १०० खाटांचे रुग्णालय आणि सीबीएसई-पद्धतीच्या शाळेचीही पायाभरणी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांतून ह्या ऐतिहासिक सोहोळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या या भागात औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करणे हे त्यांचे आणि गडचिरोलीतील लोकांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. "जिल्ह्यात लोहखनिजाचे समृद्ध साठे आणि येत्या ३० महिन्यात तयार होऊ घातलेल्या एकात्मिक पोलाद प्रकल्पामुळे, भारत लवकरच चीनशी स्पर्धा करू शकेल. एलएमईएल आणि गडचिरोलीतील लोक एकत्र प्रगती करीत आहेत याचा मला आनंद आहे. आतापर्यंत १४,००० लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. स्टील प्लांटमुळे २०,००० अतिरिक्त नोकऱ्या निर्माण होतील," असे ते म्हणाले.
गडचिरोलीमध्ये दुय्यम पोलाद प्रकल्प सुरू झाल्यानंतर, एक स्टील क्लस्टर विकसित होईल. “चांगल्या दर्जाच्या आणि कमी किमतीच्या ग्रीन स्टीलसह चीनशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही श्री. प्रभाकरन यांना सर्वप्रकारे सहकार्य देऊ,” असे ते म्हणाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी नोकऱ्या देण्याच्या एलएमईएलच्या उपक्रमाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
व्होल्वो पेलेट ट्रकच्या महिला चालकांचे कौतुक करून आणि त्यांना 'पोलादी महिला' असे वर्णन करून, मुख्यमंत्र्यांनी एलएमईएलने महिलांना घरकाम, नंतर हलके मोटार वाहन चालविण्याचे, आणि नंतर जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यामुळे त्यांच्या उत्पन्नात १२ रुपयांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली असून त्यांच्या आर्थिक स्थैर्यात सकारात्मक बदल घडले आहेत तसेच त्यांची प्रतिष्ठा उंचावली आहे, असेही ते म्हणाले.
लोहखनिज वाहतुकीत कार्बन उत्सर्जन कमी करणारी स्लरी पाइपलाइन, पेलेट प्लांट, हिरव्या वाहनांचा ताफा यासारख्या उपक्रमांमुळे गडचिरोलीचा विकास पर्यावरणपूरक झाला आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, "गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात हिरवागार जिल्हा आहे. औद्योगिकरण होत असताना सुद्धा आम्हाला ही ओळख कायम ठेवायची आहे. म्हणूनच, आम्ही दोन वर्षांत एक कोटी झाडे लावण्याचा प्रण केला आहे आणि आज सरकार ४० लाख वृक्षारोपण मोहीम सुरू करत आहे." गडचिरोलीमध्ये राजामुंद्रीसारखी उच्च गुणवत्ता रोपवाटिका उभारण्याच्या त्यांच्या सूचनेवर काम केल्याबद्दल त्यांनी एलएमईएलचे कौतुक केले. कर्टिन विद्यापीठाच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठात स्थापन करण्यात आलेला युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कर्टिन विद्यापीठात गडचिरोलीतील तरुणांच्या उच्च शिक्षणासाठी प्रायोजित कार्यक्रम यासारख्या विविध उपक्रमांसाठी त्यांनी श्री. प्रभाकरन यांचे कौतुक केले. भविष्यात, भारतातील सर्वोत्तम खाण अभियंते गडचिरोलीतील असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कामगारांना कंपनीत भागधारक बनवणाऱ्या ESOP ह्या उपक्रमाचा संदर्भ दिला, तसेच कोनसरी येथे एक नवीन शाळा, एक नवीन रुग्णालय ह्या प्रकल्पांचाही उल्लेख केला. ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्याची सरकारी योजना लॉयड्स रुग्णालयांद्वारे सुद्धा राबवली जाईल, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
तत्पूर्वी, अ‍ॅड. आशिष जयस्वाल म्हणाले, “गडचिरोली अतिशय वेगाने प्रगती करत आहे. काही जण लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी, गडचिरोलीचे लोक त्याला बळी पडणार नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, गडचिरोली लवकरच महाराष्ट्रातील टॉप-५ जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होईल. गडचिरोलीच्या विकासाबाबतच्या प्रकल्पांना ते कधीही नकार देत नाहीत.” कामगारांना कंपनीचे भागधारक बनविल्याबद्दल त्यांनी प्रभाकरन यांचे विशेष कौतुक केले.

आपण चीनशी स्पर्धा करू शकतो: प्रभाकरन..
आपल्या भाषणात, बी. प्रभाकरन म्हणाले की एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे काम ३० महिन्यांत पूर्ण होईल आणि मुख्यमंत्र्यांना त्याच्या उद्घाटनासाठी येण्याचे आवाहन केले. “त्यापूर्वी, आम्हाला अतिविशेषोपचार रुग्णालय आणि शाळा ह्यांचे काम पूर्ण करायचे आहे. सरकारच्या सहकार्याने, आम्ही पोलाद गुणवत्तेत आणि दर्जामध्ये चीनशी स्पर्धा करू शकतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
स्थानिक लोकांशी भावनिक संबंध जोडत, प्रभाकरन यांनी त्यांचे बहुतेक भाषण मराठीत केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले. "आम्ही मिळून गडचिरोलीची यशोगाथा रचली आहे," असे ते मराठीत म्हणाले. त्यांनी कंपनीच्या गडचिरोलीतील आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की एलएमईएलने प्रशिक्षित केलेल्या १,५०० लोकांना एलटी गोंडवाना मार्फत रोजगार मिळाला आहे आणि आणखी ३,००० लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ईएसओपी अंतर्गत, आतापर्यंत कामगारांसह १०,६०० कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग मिळाले आहेत ज्यामुळे ते केवळ कामगारच नाहीत तर कंपनीचे भागधारक देखील बनले आहेत.
ज्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली त्याबद्दल बोलताना श्री. प्रभाकरन म्हणाले की जमशेदपूर पोलाद प्रकल्पाचा प्रवास १ एमटीपीए क्षमतेने सुरू झाला होता आणि एलएमईएलचा कोनसरी पोलाद प्रकल्प ४.५ एमटीपीए क्षमतेचा प्रस्तावित आहे जो २ टप्प्यात पूर्ण होईल. "जिल्ह्यात दुय्यम पोलाद प्रकल्प सुरू व्हायला हवे कारण आपल्याकडे उच्च दर्जाचे पेलेट्स आहेत," असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एलएमईएलमध्ये सामील झालेल्या एकूण १,४०० तरुणांपैकी चार तरुणांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने प्रायोजित केलेल्या कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवडलेल्या तिसऱ्या तुकडीच्या सहा उमेदवारांना त्यांनी बोर्डिंग पास देखील प्रदान केला. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतलेल्या ५० पैकी पाच विद्यार्थ्यांना फडणवीस यांनी पत्रे देखील प्रदान केली. त्यांनी एकूण ६०० कामगारांपैकी पाच जणांना कर्मचारी स्टॉक ऑप्शन समभाग प्रमाणपत्रे प्रदान केली. तसेच, त्यांनी 'लॉयड्स अँथम' लाँच केले, जे या प्रसंगी वाजवले गेले आणि लोकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.
Chief Minister Fadnavis lays the foundation stone of Maharashtra's mega integrated steel plant at Konsari!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #CM #LMEL #MediaVNI

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->