दि. 01 जुलै 2025
माजी खासदार डॉ अशोक नेते यांचा लोकमत भूषण २०२५ सन्मानाने गौरव.!
- सामाजिक कार्यासाठी समर्पित नेतृत्वाला मिळाला ‘लोकमत भूषण’ सन्मान.!
मीडिया वी.एन.आय :
नागपूर : ‘लोकमत भूषण २०२५’ या पहिल्याच भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अँड.वामनराव चटप माजी आमदार, राजुरा व अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, गोंदिया,समाज कल्याण उपायुक्त गायकवाड साहेब, नागपूर चे पोलीस निरीक्षक भुजबळ, तर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांची उपस्थिती लाभली.तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लोकमत समूहाचे प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना “लोकमत भूषण २०२५” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी बोलताना डॉ. नेते म्हणाले: "लोकमत समूहाचे खरे शिल्पकार 'बापुजी' या नावाने ओळखले जाणारे दर्डा जी यांनी या संस्थेला एक विशाल वटवृक्ष बनवले. आज लोकमत हे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगल्भ कार्य करत आहे. मला ‘लोकमत भूषण’ पुरस्कार मिळाल्याचा अभिमान असून, या गौरवाबद्दल मी लोकमत समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो."
तसेच पुढे बोलताना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन आणि त्यांची कामगिरी यांचीही त्यांनी विशेष स्तुती केली."अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाम निर्णयशक्तीला जाते," असे गौरवोद्गार डॉ. नेते यांनी काढले.
हा पुरस्कार सोहळा फक्त गौरवाचा नव्हता, तर सामाजिक कार्यातील योगदान आणि सकारात्मक बदलासाठी कार्यरत असलेल्या नेतृत्वाच्या प्रेरणादायी प्रवासाला दिलेला मान होता.
Former MP Dr. Ashok Nete honored with Lokmat Bhushan 2025 award!
- Leadership dedicated to social work receives ‘Lokmat Bhushan’ award!
#Nagpur #Gadchiroli #MediaVNI #Maharashtra