दुचाकी शोरूम ची ईमारत कोसळून ३ ठार, ३ गंभीर जख्मी.!
मीडिया वी.एन.आय :
या भीषण घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आकाश बुराडे (रा. निलज, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर), केतू शेख आणि अशपाक शेख (दोघेही रा. वडसा, जि. गडचिरोली) या युवकांचा समावेश आहे. मलब्यातून जीव वाचवण्यात यश आलेले दीपक अशोक मेश्राम, विलास कवडू मने (दोघेही रा. आरमोरी) आणि सौरभरवींद्र चौधरी (रा. मेंढकी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) हे तिघे सध्या उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचार घेत आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने राबवण्यात आले. ही इमारत जीर्ण अवस्थेत होती का, याची चौकशी प्रशासनाकडून सुरु असून, अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
3 killed, 3 seriously injured as two-wheeler showroom building collapses!