लिटील हर्टस विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा उत्साह; विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही संपन्न.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

लिटील हर्टस विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा उत्साह; विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही संपन्न.!

दि. 12 जानेवारी 2026
MEDIA VNI 
लिटील हर्टस विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा उत्साह; विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही संपन्न.! 
- लिटील हर्टस विद्यालयात विविध उपक्रमांनी शालेय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली /चामोर्शी /आष्टी : साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा द्वारा संचालित, लिटल हार्ट्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य व सिंधुताई सपकाळ यांच्या स्मुर्तीदिन प्रीत्यर्थ विद्यालयात तीन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धा तसेच विंग्स ऑफ होप फाउंडेशन चंद्रपूर, श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुद्देशीय सेवा संस्था आष्टी तसेच निर्मल गणेश बहुद्देशीय सेवा संस्था आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा अध्यक्ष अनिल आल्लूरवार व उद्घाटक म्हणून माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी तसेच संजय पंदिलवार, संस्थेचे सचिव रमेश आरे, कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक,  विनोदभाऊ भोयर, मनोहर पाटील बामनकर, अविनाश विस्रोजवार, राजनाथ कुशवाह, येंबडवार सर तसेच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. मंडल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.
याप्रसंगी कार्यक्रमातील उपस्थित पाहुणे मंडळींनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, मेजर ध्यानचंद, माता सरस्वती यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन करून मालार्पण करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत पेटविण्यात आली व क्रीडा संमेलनाचे रीतसर उद्घाटन पार पाडण्यात आले. त्यानंतर क्रीडा शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांच्या चमूंनी उत्कृष्ठ असे पथसंचलन करीत क्रीडाध्वज व मान्यवरांना मानवंदना दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात माजी आमदार मा. ना. डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले. यावेळी त्यांनी आष्टी परिसरातील राष्ट्रीय खेळाडू कु. श्वेता कोवे हिचे उदाहरण देत व्यक्तीला यशस्वी होण्याकरिता जिद्द व मेहनत करण्याची तयारी अंगी असणे अत्यावश्यक असल्याचे पटवून दिले.
 त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून शाळेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये विंग्स ऑफ होप फाउंडेशन चंद्रपूर चे अध्यक्षा डॉ. माधुरी इंगळे, उपाध्यक्ष डॉ. सुष्मा लीडर, डॉ. नेहा सोनारकर, जाहिद शेख, मोफिज खान, श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुद्देशीय सेवा संस्था आष्टी चे  पवन रामगीरकर, कपिल मसराम तसेच निर्मल गणेश बहुद्देशीय सेवा संस्था आष्टी चे अध्यक्ष देवाभाऊ बोरकुटे व ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील कु. आशा सोनवणे, मनीष वासमवार, जुलिया झाडे, प्रज्वल चांदेकर आदींच्या सहकार्यातून आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील सहा. शिक्षक श्री. गुरुदास पुच्चलवार तर प्रास्ताविक राजेश खोब्रागडे तर आभार प्रदर्शन प्रवीण चिताडे यांनी केले व सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->