सुशीला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सुशीला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न.!

दि. 18 जानेवारी 2026
MEDIA VNI 
निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न.!
​११८ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
गडचिरोली/​चामोर्शी:घोट : 
मीडिया वी.एन.आय : 
सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा यांच्या वतीने शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील ११४ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून विविध सेवांचा लाभ घेतला.
​शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. रुपाली दुधाबावारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोट समितीचे अध्यक्ष विशाल दहिवले व संस्थेचे अध्यक्ष गोकुळदास वाकडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य वर्षा शेट्टे, वर्षा नेवारे (ग्रामसंघ महिला बचत गट), प्रदीप वाकडे (बौद्ध समाज सचिव), वनिता पोरेड्डीवार (ग्रा.पं. सदस्य), उर्मिला पोगुलवार (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), सीताराम बारसागडे आणि डॉ. आशुतोष जावडेकर उपस्थित होते.
​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. संस्थेच्या सचिव प्रियंका शेंडे यांनी प्रास्ताविकातून 'आरोग्य हीच खरी संपत्ती' असल्याचे सांगून शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अशा शिबिरांच्या उपयुक्ततेवर भर दिला.
​तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी:
शिबिरात गडचिरोली व परिसरातील नामांकित डॉक्टरांनी आपली सेवा दिली. यामध्ये दंत शल्य चिकित्सक डॉ. आशुतोष जावडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकरे सर, नेत्र तज्ज्ञ डॉ. प्रांजय हर्ष, समुपदेशक नागेश मादेशी (ICIC) व त्यांच्या वैद्यकीय पथकाचा समावेश होता. पथकाने नागरिकांची रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar), हिमोग्लोबिन, डोळे व दंत तपासणीसह सर्वसाधारण आजारांची तपासणी केली.
​शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ व गावकरी, प्रामुख्याने दिलीप खोब्रागडे, मुरलीधर देवातळे, खुशाल खोब्रागडे, आकांशा डोंगरे, स्मिता खोब्रागडे, संध्या वाकडे, जोसना खोब्रागडे, छब्बू फुलझेले, सविता खोब्रागडे, पलक वैरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खोब्रागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन खुशाल खोब्रागडे यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->