रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा; दोटकुली येथील आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा; दोटकुली येथील आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे.!

दि. 10 डिसेंबर 2025 
MEDIA VNI 
रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा; दोटकुली येथील आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : तालुका प्रतिनिधी चामोर्शी : 
रस्त्याच्या मागणीसाठी चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत दोटकुली येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले हनाजी कैकाळू शेंडे यांचे आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शुक्रवारी (दि. ९ जानेवारी २०२६) मागे घेण्यात आले. प्रशासनाने येत्या १५ दिवसांत रस्त्याच्या कामावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
नेमकी घटना काय?
हनाजी शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी ७ जानेवारी २०२६ पासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत कमिटीने उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

प्रशासनाचे आश्वासन
या चर्चेदरम्यान, प्रशासनाकडून येत्या १५ दिवसांत रस्त्याबाबत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून हनाजी शेंडे व इतर ग्रामस्थांना वहिवाटीचा मार्ग काढून देण्याची लेखी हमी देण्यात आली. या आश्वासनानंतर शुक्रवारी दुपारी ४:०० वाजता उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रशासनाच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी (पंचायत समिती चामोर्शी) येरमे मॅडम, विस्तार अधिकारी चलाख साहेब, भूमी अभिलेखचे निखुरे साहेब, आर.आय. योगनकर, तलाठी ठाकरे साहेब, पंचायत अधिकारी शेंडे आणि दोटकुलीच्या सरपंच सौ. जया अभिजीत सातपुते उपस्थित होते. ग्रा, पं सध्यक्ष पुटकमवार व आर आय सोमणकर उपस्थित होते.
 तसेच उपोषणकर्ते हनाजी शेंडे यांच्यासोबत मारोती बोयर, रमेश बोयर, देवलाबाई शेंडे, मायाबाई बोयर व तिलोत्तमा शेंडे यांनी या यशस्वी तोडग्याचे स्वागत केले आहे. १५ दिवसांत मार्ग न निघाल्यास ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->