दि. 31 मार्च 2026
माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३१ मार्च २०२६ रोजी स्थानिक गडचिरोली येथील जिल्हा महिला रुग्णालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांना माणुसकीचा एक घास या उपक्रमाद्वारे अन्नदान वाटप केले. तसेच गडचिरोली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा केले. वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.
वाढदिवसानिमित्त माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसगडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघारे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, जेष्ट नेते रमेशजी भुरसे, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुणघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, नगरसेवक रमेश चौधरी, अविनाश विश्रोजवार, गोवर्धन चव्हाण, नगरसेवक हर्षल गेडाम, विनोद देवोजवार, भूपेश कुळमेथे, अभिजित कोरडे, भारत खटी, अतुल मल्लेलवार, जनार्दन साखरे, मंगेश रणदिवे, रमेश नैताम, नगरसेवक वर्षा शेडमेक, नगरसेवक सीमा कन्नमवार, नगरसेवक साक्षी बोलूवार, नगरसेवक शिल्पा गव्हारे, घनश्याम मडावी, नगरसेवक केशव मडावी, दत्तु माकोडे, श्याम वाढई, रामरत्न गोहने, नगरसेवक अर्चना निंबोळ, देवाजी लाटकर, नगर सेवक कोमल नैताम, नगरसेवक ज्ञानेश्वरी धंद्रे, नगरसेवक गुड्डी मारभाते, नगरसेवक सीमा कन्नमवार, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, विलास दशमुखे, संजय बारापात्रे, कीर्तीताई मासुरकर, लक्ष्मीताई कलंत्री, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, केशव निंबोळ, श्रीकांत पतरंगे, प्रफुल आंबोरकर, संजय गावडे, पंकज खोबे, बंटी करगामी, रक्षक सातारे, ओम् राजगडकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त वाढदिवसाला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. उसेंडी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. सर्वांनी स्नेहसंमेलनाच्या वातावरणात एकत्र येत आपुलकीने शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
