दि. 12 एप्रिल 2026
जिद्द, चिकाटी आणि 'खाकी'चं स्वप्न! गडचिरोलीच्या तीन लेकींची पोलीस भरतीत ऐतिहासिक भरारी.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली: असं म्हणतात की, स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. हाच विचार उराशी बाळगून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील एका शेतकरी कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट पोलीस दलाला गवसणी घातली आहे.
बापाच्या कष्टाचं फळ, लेकींची मोठी झेप!
कोरची तालुक्यातील खुणारा या छोट्याशा गावातील श्यामलाल कुमरे यांची शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात परिस्थिती बेताचीच, पण मुलींची स्वप्नं मात्र आभाळाएवढी होती. पल्लवी, नूतन आणि अश्विनी या तिन्ही बहिणींनी ठरवलं होतं की, वडिलांच्या अंगावरचा घामाचा वास पुसून तिथे 'कर्तृत्वाचा दरवळ' आणायचा. आणि अखेर नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरतीच्या निकालात या तिघींनीही बाजी मारली आहे.
संघर्षातून शिखराकडे...
या तिन्ही रणरागिणींची महाराष्ट्र पोलीस दलात एकाच वेळी निवड झाली आहे. हे केवळ यश नाही, तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी प्रेरणा आहे. अंगात जिद्द असेल तर सुविधांची कमतरता कधीच अडसर ठरू शकत नाही, हे या कुमरे भगिनींनी सिद्ध करून दाखवलं.
एकाच घरातील ३ बहिणी आता पोलीस अधिकारी.
दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबाचा गौरव.
शेतकरी बापाच्या कष्टाचं खऱ्या अर्थाने मिळालं फळ.
आज संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून या तिघींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'MEDIA VNI' कडून या तिन्ही रणरागिणींना त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.!
Stubbornness, perseverance and the dream of 'khaki'! Three girls from Gadchiroli make a historic leap in police recruitment!
#MediaVNI #Gadchiroli #Maharashtra #GadchiroliPolice #police