'सामान्यांचा आधार' 'विकासाचा निर्धार' जनतेच्या विश्वासाचा जननायक!; मा. डॉ. अशोकजी नेते आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

'सामान्यांचा आधार' 'विकासाचा निर्धार' जनतेच्या विश्वासाचा जननायक!; मा. डॉ. अशोकजी नेते आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दि. 1 जुलै 2026 



             MEDIA VNI / मीडिया वी.एन.आय 

🎉 जाहिरात | वाढदिवस अभिष्टचिंतन 🎉

🔷 मा. डॉ. अशोकजी नेते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂 माजी खासदार, राष्ट्रीय महामंत्री (भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा) व गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे जननेते

💐 भारतीय जनता पार्टी, गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा.
MEDIA VNI – Advertisement


सामान्यांचा आधार... विकासाचा निर्धार... जनतेच्या विश्वासाचा जननायक!
--------------------------------------
संघर्ष, समर्पण, विकास आणि जनसेवेचा अखंड प्रवास

माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव लेख

१ जुलै २०२६

लेखनकर्ते : दिवाकर गेडाम माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख

"नेतृत्व हे पदामुळे मोठे होत नाही; जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळे ते अजरामर होते."

गडचिरोलीच्या दुर्गम मातीतून उभा राहिलेला, संघर्षाला शस्त्र आणि जनसेवेला धर्म मानणारा, पदापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देणारा, विकासाला राजकारणाचे अंतिम ध्येय मानणारा आणि पराभवानंतरही जनतेच्या विश्वासाचा दीप तेवत ठेवणारा नेता म्हणजे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते.

१ जुलै हा त्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा दिवस नाही; तर एका सामान्य कार्यकर्त्याने अथक परिश्रम, जिद्द, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टीच्या बळावर राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत केलेल्या अद्वितीय प्रवासाला अभिवादन करण्याचा दिवस आहे.
शून्यातून सुरू झालेला संघर्षाचा प्रवास
डॉ. अशोकजी नेते यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. पण मनात समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती.

मोठे बंधू नामदेवराव नेते हे आरटीओ म्हणून शासकीय सेवेमुळे गडचिरोलीत येण्याचा योग आला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी चौकात 'तृप्ती भोजनालय' सुरू केले.
खानावळ चालविताना त्यांना सामान्य माणसाचे जीवन जवळून अनुभवता आले. गरिबांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे अश्रू,ओबीसी समाजाचे प्रश्न, आदिवासी समाजाचे दुःख, बेरोजगार युवकांची धडपड आणि प्रशासनातील अडचणी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या.

याच काळात समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी 'जिल्हा गर्जना' हे साप्ताहिक सुरू केले. पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला.

कार्यकर्ता ते लोकनेता
त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यास सुरुवात केली.
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष...जिल्हाध्यक्ष...
आमदार...पुन्हा आमदार...
खासदार...पुन्हा खासदार...
आणि पुढे भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री...
हा प्रवास कोणत्याही राजकीय वारशावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर उभा राहिला.

पराभव स्वीकारला... पण जनतेचा हात कधी सोडला नाही
राजकारणात विजय आणि पराभव हे दोन्ही असतात.
परंतु अनेकजण पराभवानंतर जनतेपासून दूर जातात.
डॉ. अशोकजी नेते यांनी मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही जनतेचा हात सोडला नाही.
ते आजही दररोज जनसंपर्क कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या ऐकतात.एखाद्या गरीब रुग्णाच्या उपचारासाठी मदतही उभी करतात.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करतात.
आपत्तीग्रस्त कुटुंबांना धीर देतात.कोणत्याही पदाशिवाय सातत्याने जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे, हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे.
लोकसभेतील बुलंद आवाज
खासदार म्हणून त्यांनी संसदेत गडचिरोलीचा आवाज बुलंद केला.
संसदेत शेकडो प्रश्न उपस्थित करून आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक, रस्ते, रेल्वे, सिंचन, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासाचे प्रश्न सातत्याने मांडले.
त्यांच्यासाठी संसद म्हणजे केवळ भाषणाचे व्यासपीठ नव्हते; ती गडचिरोलीच्या जनतेसाठी न्याय मिळवण्याची लढाई होती.

विकासाचा ध्यास... गडचिरोलीचा कायापालट

डॉ. अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक विकासकामांना गती मिळाली.
त्यामध्ये—वडसा–गडचिरोली रेल्वे मार्ग,नागभीड काम्पा,टेम्पा चिमुर वरोरा नवीन रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण,पंधरा हजारो कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग, सूरजागड लोह प्रकल्प,कोनसरी स्टील प्रकल्प, कृषी महाविद्यालय,वैद्यकीय महाविद्यालय,गोंडवाना विद्यापीठ,हवाई पट्टा,नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर एकलव्य विघालय,सिंचन बंधारे,ग्रामीण क्रीडा व युवक विकास, आदिवासी भागातील मूलभूत सुविधा,अशा असंख्य कामांमुळे गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळाली.

शेतकऱ्यांचा खंबीर आधार पराभवानंतरही त्यांनी विकासाचा पाठपुरावा थांबवला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या चार महत्त्वाच्या उपसा सिंचन योजनांसाठी त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला.
रंगायपल्ली, रमेशगुडम, शांतीग्राम आणि राजीव-चिंचोड या योजनांमुळे सुमारे ४८ गावांतील ९,५७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, सुमारे ७२२.९५ कोटी रुपयांची विकासकामे साकारत आहेत.
हा त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे.

राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास

डॉ. अशोकजी नेते यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय महामंत्री म्हणून विश्वास व्यक्त केला.

देशातील विविध राज्यांमध्ये संघटन विस्तार, आदिवासी बहुल समाजाशी संवाद व प्रश्न पक्षवृद्धी आणि कार्यकर्ते घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
त्यांचे संघटन कौशल्य राष्ट्रीय स्तरावर मान्य झाले.

सन्मानांनी गौरवलेले व्यक्तिमत्त्व

त्यांच्या जनसेवेचा गौरव विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी केला.

'संसद आदर्श पुरस्कार', विविध मानपत्रे, सामाजिक गौरव तसेच 'डॉक्टर ऑफ सोशल वर्क' ही मानद पदवी अशा अनेक सन्मानांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.

परंतु त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे जनतेचा विश्वास आणि प्रेम.

साधेपणा हीच खरी ओळख

डॉ. अशोकजी नेते यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा.
सामान्य नागरिकांशी सहज संवाद...
प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग...
जात, धर्म, पक्ष यापलीकडील माणुसकी...
कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता...
आणि विकासासाठी अविरत धडपड...
यामुळेच ते आज सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय आहेत.

जनतेच्या मनातील नेता

आजही गडचिरोली जिल्ह्यात एखाद्या नागरिकाला अडचण आली की त्याला आठवण होते ती डॉ. अशोकजी नेते यांची.
सत्ता असो वा नसो...
पद असो वा नसो...
जनतेच्या सेवेत कधीही खंड पडू न देणारे नेतृत्व म्हणजे डॉ. अशोकजी नेते.

याच कारणामुळे ते आजही हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेरणास्थानी आणि लाखो नागरिकांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू आहेत.

वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
आदरणीय डॉ. अशोकजी नेते साहेब,
आपणास निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो.
आपल्या नेतृत्वातून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, विदर्भ आणि देशातील आदिवासी समाजाच्या विकासाला नवी ऊर्जा मिळत राहो.

जनतेच्या विश्वासाचे हे नाते अधिकाधिक दृढ होत राहो.
आपल्या हातून विकासाची नवी पर्वे घडत राहोत.

ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, अखंड कार्यशक्ती आणि शतायुषी आयुष्य देवो, हीच सदिच्छा.

हार्दिक वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

"जनतेचा विश्वास... सामान्यांचा आधार... विकासाचा निर्धार... आणि सेवाभावी नेतृत्वाचे प्रेरणास्थान — डॉ. अशोकजी नेते!"
           लेखनकर्ते
— दिवाकर रामदास गेडाम
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व
सोशल मीडिया प्रमुख तसेच भारतीय जीवन विमा अभिकर्ता व्याहाड बुज ता.सावली जि.चंद्रपूर.
मो.नंबर. 9673757718
              9370499136

A pillar of support for the common people, committed to development, and a leader who has earned the public's trust—Hon. Dr. Ashokji Nete, heartfelt birthday wishes to you!

#MediaVNI #Advertisement #Birthday #Maharashtra #Ashok-Nete 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->