माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस उद्या विविध ‘सेवाकार्याने’ साजरा होणार; गडचिरोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस उद्या विविध ‘सेवाकार्याने’ साजरा होणार; गडचिरोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन!

दि. 30 जून 2026 

MEDIA VNI
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस उद्या विविध ‘सेवाकार्याने’ साजरा होणार; गडचिरोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन!
मीडिया वी.एन.आय : 
​गडचिरोली : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस उद्या, बुधवार, दिनांक १ जुलै २०२६ रोजी नेहमीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आणि 'सेवा भाव' जपून साजरा केला जाणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली शहरात विविध सामाजिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
​वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
असा असेल वाढदिवस सेवा कार्यक्रम:
​सकाळी ८:०० वाजता - एकत्रिकरण:
चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक एकत्रित जमतील.
​सकाळी ९:०० वाजता - सेमाना दर्शन व वृक्षारोपण:
गडचिरोलीचे आराध्य दैवत देवस्थान सेमाना येथे दर्शन व पुजा अर्चा यानंतर सेमाना परिसरात वृक्षारोपण सोहळा पार पडेल.
​सकाळी १०:०० वाजता - वृद्धाश्रमात मदत:
चामोर्शी रोडवरील वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ वृद्ध नागरिकांची भेट घेतली जाईल व त्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंद साजरा केला जाईल.
​सकाळी ११:३० वाजता - रुग्णांना व नातेवाईकांना भोजन-फळ वाटप:
गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'एक घास माणुसकीचा' या उपक्रमांतर्गत भोजन वाटप केले जाईल. तसेच रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात येईल.
​सायंकाळी ६:०० वाजता - अभिष्टचिंतन सोहळा:
गडचिरोली-चामोर्शी हायवेवरील गोविंदपूर येथील 'विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट (धाबा)' येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होईल. येथे उपस्थित मान्यवर डॉ. अशोक नेते यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतील..
डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस केवळ एक उत्सव नसून तो समाजसेवेचा संकल्प आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे प्रमुख या सर्व सेवाभावी कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप:-वाढदिवस केक न कापता साजरा केला जाईल.!

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->