दि. 04 जानेवारी 2025
लेख : जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा विसोरा येथे कृतीद्वारे शिक्षणाचा उपक्रम.!मीडिया वी.एन.आय : गडचिरोली :-
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, विसोरा येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कृती, कला, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते.
‘बालकांचे हक्क आणि सुरक्षितता : सुरक्षित समजून घेऊ, सारे आता सज्ञान होऊ’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण दिले जाते. तसेच विविध कायदे समजावून सांगून बालकांचे हक्क व सुरक्षिततेबाबत त्यांना माहिती दिली जाते.
रांगोळीच्या माध्यमातून कलाविष्कार, कागदकाम, चित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अध्ययनपूरक मनोरंजनात्मक खेळांमधून विद्यार्थिनींचे आकलन व स्मरणशक्तीचे मूल्यमापन केले जाते. छोटे खेळ व विविध क्रीडा प्रकारही घेतले जातात.
शाळेत बुलबुल युनिट स्थापन करण्यात आले असून त्याद्वारे ‘खरी कमाई’, आनंद मिळावा, श्रमदान आदी विविध उपक्रम राबविले जातात. थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करण्यासोबतच ३ जानेवारी व २६ जानेवारी निमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींसोबत त्यांच्या पालकांचाही सहभाग घेतला जातो. त्यामुळे शाळा, पालक आणि समाज यांच्यातील सहभाग वाढून शाळा व समाजाचा सुंदर मेळ साधला जात आहे.
- लेखिका : अर्चना सांगोळकर
प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद कन्या शाळा, विसोरा