राजेश खोब्रागडे यांची ‘राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघ’ च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राजेश खोब्रागडे यांची ‘राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघ’ च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.!

दि. 23 सप्टेंबर 2026 
MEDIA VNI 
राजेश खोब्रागडे यांची ‘राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघ’ च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.! 
- ‘राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा’च्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच आणखी एका महत्त्वपूर्ण पदाची धुरा.!
- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय व मदत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध : जिल्हाध्यक्ष राजेश खोब्रागडे यांचा निर्धार.!
- अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार; सामाजिक उत्थानासाठी संघटनेचा पुढाकार..
​मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीत अविरत व प्रामाणिकपणे कार्यरत असणारे, 'मीडिया वी.एन.आय' (MEDIA VNI) न्यूज चे मुख्य संपादक तथा संचालक "राजेश रामदास खोब्रागडे" यांची भारत सरकार मान्यताप्राप्त ‘राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघ’ च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश खोब्रागडे हे आधीपासूनच ‘राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ’ च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून, त्यांनी समाजात केलेल्या उल्लेखनीय व निःस्वार्थ समाजकार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर ही नवीन व महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र व ओळखपत्र राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम आणि प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
​राजेश खोब्रागडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांत मोठे योगदान दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, कृषी व तळागाळातील नागरिकांच्या समस्यांवर त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने रोखठोक भूमिका मांडली आहे. कोरोनासारख्या भीषण आपत्तीच्या काळातही त्यांनी थेट जमिनीवर उतरून जनसामान्यांना आधार दिला व जनजागृती निर्माण केली. त्यांच्या या उल्लेखनीय पत्रकारिता व समाजकार्याची दखल घेऊन नागपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय सोहळ्यात त्यांना ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.

​समाजातील प्रत्येक घटकाला न्याय व मदत मिळवून देणार..
आपल्या नवीन नियुक्तीनंतर भूमिका स्पष्ट करताना जिल्हाध्यक्ष राजेश खोब्रागडे म्हणाले की, “राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न आणि हक्क यासाठी आम्ही लढा देतच आहोत. आता राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून गरजू, गोरगरीब व वंचितांना योग्य न्याय आणि प्रत्यक्ष मदत मिळवून देणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल. जिल्ह्यातील जनतेवर होणारा अन्याय आणि प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचार मुळापासून दूर करण्यासाठी संघटना सदैव आक्रमकपणे जनतेच्या पाठीशी उभी राहील. सामाजिक क्षेत्रात व्यापक कार्य उभे करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
​त्याचबरोबर, पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करत असतानाच पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ’ आणि ‘राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी व रचनात्मक उपक्रम राबविले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
​या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार मित्रपरिवार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांकडून राजेश खोब्रागडे यांच्यावर अभिनंदनाचा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Rajesh Khobragade appointed as Gadchiroli District President of the ‘Rashtriya Vishwagami Samajkarya Sangh’.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #India #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->