‘प्रोजेक्ट संजीवनी’चा नवा अध्याय! १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंडांचे वाटप; पुनर्वसनासाठी शासनाचा हात.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

‘प्रोजेक्ट संजीवनी’चा नवा अध्याय! १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंडांचे वाटप; पुनर्वसनासाठी शासनाचा हात.!

दि. 02 सप्टेंबर 2026 
MEDIA VNI 
‘प्रोजेक्ट संजीवनी’चा नवा अध्याय! १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंडांचे वाटप; पुनर्वसनासाठी शासनाचा हात.!
- माओवादी हिंसाचारातून मुख्य प्रवाहाकडे वाटचाल; मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्य, पुनर्वसन निधीचेही धनादेश वितरित.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. तसेच पुनर्वसन निधीचे धनादेश, विविध साहित्य, आत्मसमर्पित सदस्यांच्या मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्य तसेच प्रशिक्षणार्थींना चारचाकी वाहन चालक परवाने मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद आता जवळपास संपुष्टात येत असून नागरिक हळूहळू माओवादी हिंसाचाराच्या भीतीतून मुक्त होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ व जहाल माओवादी सदस्यांसह अनेकांनी आजवर गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे आजपर्यंत एकूण ८१९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतणाऱ्या माओवादी सदस्यांना भूखंड, घरकुल, रोजगार, आरोग्य आणि स्वयंरोजगारासह विविध क्षेत्रांत मदत करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी आतापर्यंत एकूण १७४ भूखंड मंजूर करण्यात आले असून, यापैकी १५३ भूखंडांचे यापूर्वीच वाटप करण्यात आले होते.
दि. १ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात आणखी १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडांचे वितरण करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या पुनर्वसन निधीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकली आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना चारचाकी वाहन चालक परवाने वितरित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत स्वावलंबी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आत्मसमर्पितांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांसाठी रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि स्वयंरोजगाराशी संबंधित विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे कौतुक केले. त्यांनी सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत नव्या आयुष्यात स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिक्षा राठोड तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.

A new chapter for ‘Project Sanjeevani’! Land plots allotted to 14 surrendered Maoists; the government extends a helping hand for rehabilitation.
#गडचिरोली #MediaVNI #Maharashtra #Gadchiroli 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->