गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष; चिमुकल्यांच्या बैलजोड्यांनी खुलले शहर! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष; चिमुकल्यांच्या बैलजोड्यांनी खुलले शहर!

दि. 12 सप्टेंबर 2026 
MEDIA VNI 
गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष; चिमुकल्यांच्या बैलजोड्यांनी खुलले शहर!
पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट आणि उत्साहात चिमुकल्यांनी साजरा केला कृषी संस्कृतीचा अनोखा सोहळा.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, रंगीबेरंगी बैलजोड्यांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक संस्कृतीचा सुगंध अशा उत्साहपूर्ण वातावरणात गडचिरोली शहरात तान्हा पोळा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भारून गेले होते.
तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांनी लाकडी तसेच मातीच्या बैलजोड्या आकर्षक पद्धतीने सजवून आणल्या होत्या. फुलांची सजावट, रंगीबेरंगी बैलजोड्या आणि पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या लाडक्या बैलजोड्यांची विधिवत पूजा करून मुलांनी नैवेद्य दाखवला आणि या पारंपरिक सणाचा आनंद लुटला.
यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर आणि नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी उपस्थित चिमुकल्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना भेटवस्तू देऊन तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. लोकप्रतिनिधींच्या या आपुलकीच्या सहभागामुळे मुलांच्या आनंदात आणखी भर पडली.

कृषी संस्कृतीच्या जतनाचा संदेश.! 

तान्हा पोळा हा केवळ लहान मुलांच्या आनंदाचा सण नसून महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी परंपरेशी नाते सांगणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. शेतकऱ्याचा जिवाभावाचा साथीदार असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच श्रम, निसर्ग आणि ग्रामीण जीवनमूल्यांचा सन्मान या सणातून केला जातो.
लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, पारंपरिक सण-उत्सवांचे महत्त्व समजावे आणि पुढील पिढीपर्यंत ही समृद्ध परंपरा अखंडितपणे पोहोचावी, यासाठी तान्हा पोळ्याचे विशेष महत्त्व आहे.
चिमुकल्यांचा उत्साह, पालकांचा सहभाग आणि कृषी संस्कृतीचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा तान्हा पोळा गडचिरोली शहरात आनंद, उत्साह आणि परंपरेचा अविस्मरणीय सोहळा ठरला.

'Tanha Pola' Celebrations in Gadchiroli; City Comes Alive with Children's Miniature Bullocks! - Dressed in traditional attire and amidst vibrant decorations, little ones enthusiastically celebrated this unique festival of agrarian culture.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->