VNI:-
राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता!..
Rain in Maharashtra :राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. तर विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.