करदात्यांना मोठा धक्का! ITR भरण्यासाठी मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

करदात्यांना मोठा धक्का! ITR भरण्यासाठी मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार

Vidarbha News India:-
VNI:-
करदात्यांना मोठा धक्का! ITR भरण्यासाठी मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार
आयटी रिटर्न भरण्यासाठी यंदा मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार....31 जुलैपर्यंत आयटी रिटर्न भरण्याची मुदत...
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : ITR भरणाऱ्यांना शेवटी दिलासा मिळालाच नाही. तुम्ही जर अजूनही ITR भरला नसेल तर आजच भरा कारण आता तुम्हाला धक्का देणारी बातमी आहे. ITR भरण्याची कोणतीही मुदत वाढवण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 31 जुलैआधी तुम्हाला काहीही करून ITR फाईल करणं अत्यावश्यक आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ITR भरणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वी हा भरला नाही तर नंतर दंड भरावा लागू शकतो. तुमच्या चुकीमुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जर व्यवसायातील विक्री, उलाढाल किंवा उत्पन्न 60 लाखांपेक्षा जास्त असेल तर रिटर्न (ITR) भरावा लागेल. व्यावसायिकाचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असले तरीही ITR भरावा लागतो. TDS आणि TCS ची रक्कम वर्षभरात 25000 रुपयांपेक्षा जास्त असेल ITR भरणं बंधनकारक आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या करदात्यांना TDS + TCS ची मर्यादा 50,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
ऑनलाईन ITR कसा भरायचा?
1. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा.
2. तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
3. तुम्ही लॉग इन केले नसेल तर  'रजिस्टर युवरसेल्फ' बटणावर क्लिक करा.
4. ई-फाइल, इन्कम टॅक्स रिटर्नवर 'फाइल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.
5. सर्व माहिती अपडेट करा आणि आयटी रिटर्न भरण्याचे कारण निवडा.
6. आर्थिक वर्ष निवडा.
7. एकदा सर्व माहिती तपासा.
8. सर्वकाही बरोबर असल्यास, 'प्रीव्ह्यू आणि सबमिट करा' वर क्लिक करा.
9. आता ITR अपलोड होईल आणि तुम्हाला OTP मिळेल, तो सबमिट करा.
10. आता तुम्हाला ITR फाईलचा मेसेज येईल.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->