राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी

Vidarbha News India:-
VNI:-
राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी
Ban on plastic coated items : राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी लागू करण्यात आलीय.  
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई :  राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर आजपासून तात्काळ बंदी लागू करण्यात आलीय. प्लास्टिकचं कोटींग असलेले कप, ग्लास, चमचे, कंटेनर्स यावर आजपासून बंदी आहे. केंद्राने याआधीच सिंगल युज प्लास्टिकवर बंदी लागू केलीय. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात समिती स्थापन झाली होती. या समितीच्या शिफारसींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने परवानगी दिलीय. (Maharashtra Government bans plastic-coated, laminated goods)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या एकदाच वापरायच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना केली होती. या समितीने प्लास्टिक वापर बाबत शिफारशी केली होती. त्याला मान्यता देण्यात आली असून आता नव्या नियमानुसार प्लास्टिकच्या वस्तूंच्या उत्पादनाला आयात, निर्यात आणि वस्तूंच्या वापरांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
समिती प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली होती. राज्य सरकारने या समितीची ही शिफारस स्विकारली गेली आहे. राज्यात अशा प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 
याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. आता या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. जेणे करून पर्यावरणाला घातक असलेले प्लॉस्टिक ज्यांचा समावेश अविघटनशील पदार्थांमध्ये समावेश आहे. त्यामुळे पर्यावरणाला तसेच प्राण्यांना धोका असतो आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->