विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद

Vidarbha News India:-
VNI:-
विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत.
आज यांनी (२८ जुलै) गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
गेल्या महिनाभरापासून विदर्भात पावसाने हाहाकार उडाला आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पुराचा फटका बसला. शेकडो एकर शेती पाण्याखाली आली पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला.
धान शेतीसाठीचे मुख्य दोन महिनेच अतिवृष्टी झाल्याने नंतर पिक घेऊनही फार उपयोग होणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर येथील जमिनींचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->