गोंडवाना विद्यापीठात नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गोंडवाना विद्यापीठात नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन...

Vidarbha News India:-
VNI:-
गोंडवाना विद्यापीठात नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन... 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्हयातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण  परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन उद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी नव संशोधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे  एकदिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
स्टार्टअप यात्रेकरीता www.mahastartupyatra.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. www.mahastartupyatra.in  तसेच ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल अशा उमेदवारांनी सुध्दा व्यक्तीश:  गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उपस्थित राहावे. वयाची अट नसल्याने जिल्हयातील जास्तीत जास्त नवउद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्थांनी सहभागी होण्याकरीता जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राच्या मुख्य टप्यामध्ये प्रास्ताविक व विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती, स्थानिक स्टार्टअप / उद्योजकाची व्याख्याने ,स्टार्टअप व नवउद्योजकता कार्यशाळेचे विषय, सादरीकरण सत्र व मुल्यमांकन तसेच जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे प्रथम व व्दितीय असे दोन सत्र करण्यात आले असून सकाळी १० ते सकाळी ११.३० या वेळेत सुरु होईल. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती साहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे ,   उद्योजकता या विषयी एस.डी.नागमोटी , उद्योजकता आणि नवकल्पना यावर डॉ. मनिष उत्तरवार , तसेच नवउद्योजकता विषयावर गणेश चितांकुटलावार, गडचिरोली यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. तर दुसऱ्या सत्रात दूपारी १२.४५वाजता नवउद्योजकांना सादरीकरणाची संधी देण्यात येईल .प्रत्येक सहभागीस १० मिनीटे सादरीकरणासाठी संधी मिळेल यामध्ये ५ मिनीट सादरीकरण व ५मिनीट प्रश्नोत्तराची असेल जिल्हास्तरावरील विजेत्यांची निवड कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती व्दारे केली जाईल.  
जिल्हास्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करणा-या प्रथम तीन उमेदवारांना प्रथम २५ हजार, व्दितीय १५हजार तर तृतीय १० हजार याप्रमाणे पारितोषिक दिल्या जाईल अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्रमांक २युनिट क्रं-2,कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे 07132-222368 या दूरध्वनी क्रमांकारव संपर्क साधावा असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे नव संशोधन केंद्राचे संचालक,मनिष उत्तरवार व  जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे साहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->