विदर्भ हादरला! गेल्या 72 तासांतली शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर Farmers Suicide News - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

विदर्भ हादरला! गेल्या 72 तासांतली शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर Farmers Suicide News

Vidarbha News India:-
VNI:-
विदर्भ हादरला! गेल्या 72 तासांतली शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर Farmers Suicide News

- विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा (Farmers Suicide News ) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय.
विदर्भ न्यूज इंडिया
गेल्या 72 तासांत तब्बल 9 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे विदर्भ हादरलाय. विदर्भातील अमरावती, भंडारा,  यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येची धग कायम आहे. या तीन जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांतली शेतकरी आत्महत्येची आकडेवारी डोकेदुखी वाढवणारी अशी आहे.  (Vidharbha News)
 (Maharashtra Farmers News)
कुठे किती आत्महत्या?

गेल्या 72 तासांत एकट्या अमरावती जिल्ह्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर भंडारा जिल्ह्यांमध्ये एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली. यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. यवतमाळमधील 5, अमरावतीमधील 3 आणि भंडाऱ्यातील एका शेतकऱ्यासह विदर्भातल गेल्या 72 तासांत तब्बल 9 शेतकऱ्यांनी जीव दिलाय.
अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान :-

अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान पावसामुळे झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जातंय.
आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी असल्याचं कळतंय. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे आलेलं आर्थिक संकट कसं दूर करायचं, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय.
चार जणांचा गळफास :-

आत्महत्या केलेल्या चार शेतकऱ्यांनी गळफास लावून आतलं आयुष्य संपवलं. तर इतर शेतकऱ्यांनी किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली. अमरावतीलमध्ये तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय.
सतिश मोहोड, वय 34, राहणार खैर, सागर ढोले, वय 33, राहणार मोर्शी, मंगेश सातखेडे, वय 42, राहणार सभादा या तिघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. तरत भंडाऱ्यात भास्कर पारधी, वय 40, राहणार मंधेर, यांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ जनआंदोलन समितीने याबाबतची माहिती दिली आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->