चित्रा वाघ उद्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर
- महिला मेळाव्याचे आयोजन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भाजपा महिला मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता व पक्ष बळकटीकरणासोबतच महिला सशक्तीकरणासाठी राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्या उद्या १४ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्ह्यात महिला मेळाव्याकरिता येत आहे.
भाजपा महिला गडचिरोली शहर व ग्रामीण यांच्या वतीने १४ नोव्हेंबरला सुमानंद सभागृह आरमोरी रोड, गडचिरोली सकाळी ११.०० वा. येथे भाजपा जिल्हा महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये त्या गावगाड्यातील महिलांपर्यंत भाजपाचे विचार पोहचविण्याच्यादृष्टीने संबोधित करणार आहेत.स्त्री सक्षमीकरणा सोबतच या मेळाव्याला खासदार श्री. अशोकजी नेते,आमदारडॉ.देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, माजी आमदार अमरीशराव आत्राम, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,जिल्हाचे महामंत्री रविंद्र ओल्लालवार,प्रमोद पिपरे,प्रशांत वाघरे,गोविंदजी सारडा, प्रदेश सरचिटणीस संघटन एस.टि. मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, प्रदेश संपर्क सदानंद जी कुथे, युवा मोर्चा अध्यक्ष चांगदेवजी फाये, एसटी मोर्चाचे संदीप कोरेत,ओबीसी मोर्चाचे सुनील पारधी, अल्पसंख्यांक आघाडीचे बबलुभाई हुसेनी आदींची उपस्थिती राहणार आहे.
या महिला मेळाव्याला भाजपा महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश सदस्या रेखाताई डोळस,योगीताताई भांडेकर,वर्षा शेडमाके, गीतााताई हिंगे,सुनिता ढोरे,शालुताई दंडवते, प्रीती शंभरकर,संगीताताई रेवतकर सुनंदा करकाडे,मीनाताई कोडाप, रहिमताई सिद्दिकी, दुर्गमताई, सोनालीताई पिपरे, रुकसाना पठाण,शमा अली,वच्छलाताई मुंनघाटे, गीता कुळमेथे,संघमित्रा खोब्रागडे, पल्लवी बारापात्रे,यांनी केले आहे.