Vidarbha News India - VNI
आगामी विधानसभेत भाजपा 200 पार - चित्रा वाघ
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : प्रत्येक बुथवर महिला कार्यकर्त्यांचा समावेश आसावा आणि महिलांचे संघटन मजबूत करून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला 200 हून अधिक जागा जिंकता यावा, यासाठी आपण विदर्भाच्या दौर्यावर असून महिलांच्या समस्या या दौर्याच्या निमित्ताने समजून घेत असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचे समस्या जाणून घेण्यासाठी व आगामी निवडणुकांमध्ये महिलांचे संघटन ताकतीने उभे करण्याासाठी त्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्यावर आज आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, गिता हिंगे, लता पुंगाटी, वैष्णवी नैताम, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महामंत्री गोविंद सारडा, मधूकर भांडेकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चित्र वाघ म्हणाल्या, महिलेवर अत्याचार करणार्याला कुणीही पाठीशी घालणार नाही. एटापल्ली तालुक्यातील महिलेवर झालेल्या बलात्काराचा गुन्हा चार दिवस नोंदविण्यात आला नाही. ही बाब अतिशय संतापजनक असून या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी पाठपूरावा करणार असून अत्याचार झालेल्या महिलेला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही वाघ यावेळी दिले. BJP शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शेतकर्यांना तिप्पट मदत मिळाली आहे. याशिवाय या सरकारने 250 हून अधिक निर्णय घेऊन लोकोपयोगी कार्य केले आहे. हे सरकार लोकाभिमुख असल्याचेही वाघ म्हणाल्या. महिलेवरील अत्याचाराला वाचा फोडणे हे आपल्या अजेंड्यावर आहे. महिलेकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.
महिलेवरील अत्यचार थांबले आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, अत्याचार झालेल्या महिलेसंदर्भात न्याय देताना सरकार काय भूमिका घेते. याला महत्व आहे. BJP शिदे-फडणवीस सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कटीबद्द आहे. महिलेला न्याय देताना कसूर करणार्या दोन पोलिस अधिकार्यांना शिंद-फडणवीस सरकारने निलंबित केल्याचेही म्हटले आहे. महिलेसंदर्भातील प्रश्नांना हात घालून त्यांना न्याय मिळवून देणे हे भाजपची कार्यकर्ती म्हणून आपले काम आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या याशिवाय या जिल्ह्यातील मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भातील सोयी यावर सरकारकडे पाठपूरावा करणार असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या.