पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी


Vidarbha News India - VNI 
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती  साजरी करण्यात आली. संचालक राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ डॉ.श्याम खंडारे, रासेयो विभागीय वर्धा जिल्हा रा तू म नागपूर विद्यापीठ नागपूर डॉ. आर.डी.निखाडे, डॉ. डी .शेंडे नागपूर, डॉ वाघ, जे. एस .पी. एम. महाविद्यालय, धानोरा हे उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. श्याम  खंडारे म्हणाले, पंडित नेहरुंना लहान मुलांचा अतिशय लळा होता. यामुळेच त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरा केली जाते. त्यांनी सत्य, एकता आणि शांततेला अधिक महत्व दिले. असे म्हणत त्यांनी भारत देशासाठी त्यांचे असलेले महत्त्व विषद केले.
यावेळी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->