दि. १६ डिसेंबर २०२२
सर्व विभागाच्या समन्वयाने कृषी योजनांची अंमलबजावणी करा; आ.डॉ. देवरावजी होळी
जिल्हा कृषी महोत्सवाचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते समारोप
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : केंद्रातील भारतीय जनता पार्टी व राज्यातील शिवसेना भाजपा युतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या असून त्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल त्याकरिता सर्व विभागाच्या समन्वयातून या योजनांची अंमलबजावणी करावी असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी जिल्हा कृषी महोत्सवाच्या समारोपीय प्रसंगी केली.
यावेळी मंचावर आत्म्याचे संचालक डॉ. संदीप कऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक श्री बसवराज मास्तोळी, डॉ. मुंघाटे, श्री गोपाल उईके यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
या कृषी महोत्सवातून विविध प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचा लाभ या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी व जनतेने घ्याव. या महोत्सवातून आपल्याला नवीन नवीन प्रयोग आपल्या शेतीमध्ये करता येईल अशा उपायोजना यातून जाणून घ्याव्यात व त्याची अंमलबजावणी आपल्या शेतीमध्ये करावी. यापूर्वी आपण शेतीला जोड धंदा म्हणून शेतीपूरक उद्योग केल्यास आपल्याला त्यातून मोठा आर्थिक आधार मिळेल त्याकरिता शेतकऱ्यांनी विचार करावा असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केली.