गडचिरोली : सखी वन स्टॉप सेंटर मार्फत जनजागृती - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली : सखी वन स्टॉप सेंटर मार्फत जनजागृती

दि. १७ डिसेंबर २०२२

Vidarbha News India - VNI

गडचिरोली : सखी वन स्टॉप सेंटर मार्फत जनजागृती

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : येथील सखी वन स्टॉप सेंटरने जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात माहितीपर स्टॉल लावून जनजागृती (Public awareness) केली. गडचिरोली येथे जिल्हा कृषि कार्यालयाच्यावतीने कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणात 12 ते 16 डिसेंबर दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवा दरम्यान विविध विभाग, बचत गट तथा विविध योजनांचे माहितीपर व खरेदी, विक्रीचे स्टॉल लावण्यात आले. त्या अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोलीच्यावतीने जनजागृती (Public awareness) माहितीपर स्टॉल 12 ते 15 डिसेंबर दरम्यान लावण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास अंतर्गत येणारी सखी वन स्टॉप सेंटर ही एक पीडित महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा, सुविधा याप्रमाणे वैद्यकीय, समुपदेशन, कायदेशीर, पोलिस व निवास अशा सुविधा देणारी एक महत्पपूर्ण व यशस्वी योजना आहे. सदर योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृती कमी आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक, कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. जनजागृतीच्या अनुषंगाने सखी वन स्टॉप सेंटर स्टॉल अंतर्गत विविध महिला व नागरिकांना योजनेची माहिती देण्यात आली. आपल्या आसपास पीडित महिला आढळल्यास 181, 1098 तथा जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरला संपर्क करण्याचे आवहन करण्यात आले. त्याप्रमाणे सामान्य नागरिक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉलला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली (Public awareness) व अशी पीडित महिला आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटरला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सखी वन स्टॉप सेंटरच्या तीन दिवसीय माहितीपर स्टॉलच्या यशस्वीतेकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनात तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक व इतर सर्व कर्मचार्‍यांनी सहाय्य केले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->