उपसचिव अजित बाविस्कर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या उपक्रमांचे केले कौतुक - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

उपसचिव अजित बाविस्कर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या उपक्रमांचे केले कौतुक

दि. २५ डिसेंबर २०२२

उपसचिव अजित बाविस्कर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या उपक्रमांचे केले कौतुक 
Vidarbha News India - VNI
गोंडवाना विद्यापीठातील नवसंशोधन  केंद्राच्या वनौषधी उत्पादनांचे निरीक्षण करताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, बाजूला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तसेच इतर मान्यवर
विद्यापीठातील इतर विभागांना भेटी दिल्यानंतर चर्चा करतांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, नवसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. मनिष उत्तरवार 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे  उपसचिव अजित बाविस्कर यांनी आज गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. गोंडवाना विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या नवसंशोधन केंद्राची व विविध उपक्रमांची पाहणी करून विद्यापीठामार्फत होत असलेल्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा त्यांनी केली.
यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे,प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे,नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार व  इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रातील उद्योजकांनी सहा हर्बल उत्पादने आणि पंधरा पंचगव्य आधारित उत्पादने तयार केली. यासंदर्भात त्यांनी  नवसंशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी नव संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. मनिष उत्तरवार यांनी या केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. उपसचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग अजित बाविस्कर आणि प्रताप लुबाड यांनी वनौषधींची  पाहणी केली. यावेळी त्यांनी गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेले विविध उपक्रम जाणून घेतले आणि विद्यापीठाच्या विविध विभागांना भेटी देतअल्फा अकॅडमी, संगणक लॅब,विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राची बांबू कार्यशाळा आदीं बाबत जाणून घेतले आणिआदर्श पदवी महाविद्यालय च्या एकत्रित सुविधा केन्द्र निर्माण कार्याची समीक्षा केली.
तसेच विद्यापीठात सुरू असलेल्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->