अहेरीत रानडुकराची शिकार Hunting - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

अहेरीत रानडुकराची शिकार Hunting

दि. २४ डिसेंबर २०२२

Vidarbha News India - VNI

अहेरीत रानडुकराची शिकार Hunting

गडचिरोली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणार्‍या अहेरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 29 मध्ये अवैधरित्या रानडुकर या वन्यजीवाची शिकार (Hunting) केल्याची माहिती आलापल्ली वन्यजीव संरक्षण पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना मिळताच अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी व पथक यांच्यासह ते मोकास्थळावर पोहोचले असता आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

वनविभागाच्या पथकाने परिसरात शोधमोहिम राबविली असता संशयित (Hunting) आरोपी सोनु मासा पोद्दाडी (रा. प्रभुसदन वसाहत अहेरी) यांच्या शेतात एका मोठ्या गंजामध्ये 7.50 किलोग्रॅम रानडुकराचे मटन आढळुन आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमरदंड यांच्याद्वारे न्यायवैद्यकीय चाचणीकरीता रानडुक्कराच्या मटनचे नमुने गोळा करण्यात आले. त्यामुळे सदर प्रकरणात भारतीय वन्यजीव अधिनीयम 1972 कलम 2, 29, 39, 44, 52, 56 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी रानडूकराचे मटन 7.50 किलोग्रॅम, गंज 1 नग, सत्तुर 1 नग, लाकडी खोड 1 नग, ताट 1 नग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी सोनु मासा पोद्दाडी याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात अनेक बडे मासे गवसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदर कार्यवाही गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया, गडचिरोली वनवृत्ताचे विभागीय वन अधिकारी जमीर शेख व आलापल्लीचे उपविभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक राजेश पिंपळकर, वन्यजीव संरक्षण पथकाचे वनरक्षक अनिल पवार, रुपेश तरेवार, नितेश मडावी, रसिका मडावी, चंद्रशेखर नागुलवार, वनमजुर बडु आत्राम, नानय्या येल्लुर व वाहन चालक सचिन डांगरे, महादेव यांनी पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर हे करीत आहेत.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->