शेतकरी बापाच्या मदतीला लेकीचा हात, वंदनाने फुलवली 20 एकर शेती... वाचा सविस्तर बातमी... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

शेतकरी बापाच्या मदतीला लेकीचा हात, वंदनाने फुलवली 20 एकर शेती... वाचा सविस्तर बातमी...

दि. २५.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

शेतकरी बापाच्या मदतीला लेकीचा हात, वंदनाने फुलवली 20 एकर शेती

विदर्भ न्यूज इंडिया

अहमदनगर : एकीकडे शेतकरी नवरा नको ग बाई' अशी एक आवई समाजात मुलींबद्दल उठवली जात आहे. उच्च शिक्षित तरुणी शेतकरी मुळाशी लग्न करण्यास नकार देत आहेत. मात्र आजही अनेक उदाहरणे आहेत कि ज्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन शेतीत नवे प्रयोग करण्याचे धाडस केले आहे.

असंच एक उदाहरण संगमनेर (Sangamner) तालुक्यात पाहायला मिळालं आहे. येथील शेळकेवाडीची वंदना शेळके तब्बल वीस एकर शेती सांभाळून दूध व्यवसाय करत आहे. तिने नवा आदर्श उभा केला आहे.

ही गोष्ट आहे अहमदनगर (Ahamdnagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या वंदनाची (Vandana Shelke). येथूनच जवळच शेळकेवाडी येथील लिंबाजी शेळके यांची वंदना ही मुलगी. वंदना बी. फार्मसीच्या (B Pharmacy) तिसऱ्या वर्षात शिकत असून मात्र एखाद्या तरुणाला लाजवेल अशी शेती उभारली आहे.

शेळकेवाडीत शेळके कुटुंबीयांची जवळपास 20 एकर बागायती शेती असून ती स्वतः सांभाळत आहे. यासाठी तिला कुटुंबियांची मोठी मदत होते. एकीकडे अनेक तरुणी चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावताना पाहायला मिळते.

परंतु वंदनाने याला छेद देत बी. फार्मसीचे शिक्षण सुरू असतानाही आधुनिक पद्धतीने शेती करत तिची ही जिद्द व परिश्रम पाहून कुटुंबीय देखील तिच्या खांद्याला खांदा लावून मदत करत आहे.

वंदनाचे वडील म्हणतात कि, वंदना व ऋतृजा अशा दोन मुली आहेत. मुलगा नसल्याने शेती करण्यासाठी कोणीच नव्हते. मात्र आज माझ्या दोन्ही मुली मुलाप्रमाणेच शेती करत आहे. वंदना बी. फार्मसी करत असून, तिला ट्रॅक्टर चालविण्याचा छंद होता म्हणून ट्रॅक्टर घेऊन दिला. त्यामुळे ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची सर्व कामे करत आहे. दोन्ही मुलींनी आजपर्यंत मुलाची ऊणीव भासून दिली नाही. त्यामुळे माझ्या वंशाचा दिवा या दोन्ही मुलीच आहेत.

घरात लहानपणा पासून शेती पाहत आलेय त्यामुळे आवड निर्माण झाली..आज मजूर मिळत नाही.. त्यामुळे सगळी काम शेतकऱ्याला करावी लागतात.. शेतकऱ्याच्या मुलींनी शेती केली पाहिजे.. शेतकरी मुलगा नको म्हणणाऱ्या मुलींनी सुद्धा शेती केली पाहिजे. वडील लहानपणापासूनसोबत ठेवायचे. शेतीची कामे त्यांनी समजून सांगितली. आज शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे, सरकारने शेती मालाला हमीभाव दिला पाहिजे, अस माझं मत असून शेती करणाऱ्या भविष्य मोठं आहे, अस मत वंदनाने व्यक्त केल आहे.

खरं तर 'आज शेतकरी नवरा नको ग बाई' अशी अवस्था सध्या समाजात दिसून येत आहे. अनेक मुली शेतकरी मुलगा असल्याने नाकारल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र आज वंदनाने शेतीत ज्या पद्धतीने स्वतःला झोकून देऊन काम करते आहे, त्यावरून इतरांसाठी ती आदर्श ठरली आहे. अलिकडे शेती व्यवसाय झाल्याने त्यात आधुनिकता वाढली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा वापर, तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आणि नवीन प्रयोग वंदना करत आहे. नांगरणी, रोटा मारणे, फवारणी, पाणी भरणे, दूध काढणे आदी कामे ती करते. आपली मोठी बहीण अगदी जीव ओतून शेतीत रमते हे पाहून छोटी बहीण ऋतुजा देखील तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मदत करते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->