दि. १० फेब्रुवारी २०२३
गडचिरोली - चामोर्शी मार्गावर भीषण अपघात ओव्हरटेकच्या नादात कार झाली चकनाचुर चालक गंभीर जखमी
प्रतिनिधी/गडचिरोली : गडचिरोली चामोर्शी मार्गावर सेमानासमोर पाचशे मीटर अंतरावर अति वेगाने येणारी होंडा सिटी MH31CP1539 या नंबरची कार, गाडी चालक 'चिंना गडमवार' (वय २४) या तरुणाने दारूच्या नशेत ओव्हरटेकच्या नादात अति वेगाने गाडी चालवत स्वतःचे गाडीवरील संतुलन नियंत्रण बिघडल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जावून मोठ्या झाडाला बेधडक ठोकली, सदर घटना ही दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. गाडी चालक चामोर्शी जवळील कुरुड गावचा रहिवासी असून तो गडचिरोली लग्नाकरिता आला होता. परत चामोर्शीकडे जात असतांना हा भीषण अपघात घडून आला, या अपघातामुळे चालक गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरून त्यांच्याच परिचयाचे व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जखमी चालकास भरती केले.