Vidarbha : वेगळ्या विदर्भासाठी निघणार 'विदर्भ निर्माण यात्रा', सिंदखेडराजामधून होणार प्रारंभ - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

Vidarbha : वेगळ्या विदर्भासाठी निघणार 'विदर्भ निर्माण यात्रा', सिंदखेडराजामधून होणार प्रारंभ

दि. ८ डिसेंबर २०२३

Vidarbha News India - VNI

Vidarbha : वेगळ्या विदर्भासाठी निघणार 'विदर्भ निर्माण यात्रा', सिंदखेडराजामधून होणार प्रारंभ

विदर्भ न्यूज इंडिया

वेगळ्या विदर्भाच्या (separate Vidarbha) मुद्द्यावरुन पुन्हा एकदा विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे.

वेगळ्या विदर्भासाठी 'विदर्भ निर्माण यात्रा' (Vidarbha Nirman Yatra) निघणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती ही यात्रा काढणार असून, येत्या 21 फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेडराजामधून या यात्रेची सुरुवात होणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार वामनराव चटप (Wamanrao Chatap) यांनी दिली.

विदर्भ निर्माण यात्रा ही पश्चिम विदर्भातून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधून निघणार आहे. तर पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे. दरम्यान, वेगळ्या विदर्भासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक होताना दिसत आहे. वेगळा विदर्भ करण्याचा विषय कायम निकाली काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे चटप म्हणाले.

लढेंगे जितेंग, कटेंगे मगर हटेंगे नही

वेगळा विदर्भ करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी, सामान्य लोकांपर्यंत प्रश्नांसह आमची मागणी कळावी यासाठी ही विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात येणार असल्याचे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले. शुरु हुई है जंग हमारी, लढेंगे जितेंग, कटेंगे मगर हटेंगे नही. लाठी खाऊ, गोळी खाऊ पण विदर्भ राज्य मिळवून राहू असेही चटप यावेळी म्हणाले. विदर्भातील सिंचनाचा अनुषेश संपवायचा असेल, शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असती, नक्षलवादाला आळा घालायचा असेल, तसेच येथील प्रदूषण कमी करायचे असेल, कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढवायचे असतील तर वेगळा विदर्भ झाला पाहिजे असेही चटप यावेळी म्हणाले.

विदर्भातील माणसाला सन्मानाने जगता यावं म्हणून वेगळा विदर्भ गरजेचा

विदर्भातील माणसाला सन्मानाने सुखाने आणि समाधानाने जगता यावे यासाठी वेगळा विदर्भ करणे गरजेचे असल्याचे वामनराव चटप म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला आहे. लोकांनी त्यांना शिक्षा दिली असल्याचेही चटप यावेळी म्हणाले. ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी दाखल होणार असून देवरी, सडक अर्जुनी 27 रोजी आगमन होईल. गोरेगाव येथे मुक्कामी तसेच 28 रोजी गोंदिया व तिरोडा तालुक्यात असणार आहे. यानंतर भंडारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य तत्काळ निर्माण करावे, राज्य सरकारने विजेची दरवाढ मागे घ्यावी, शेत मालावरील जीएसटी रद्द करावी, कृषी पंपांना दिवसा वीज द्यावी, वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे, बल्लारपूर - सुरजागढ व खामगाव - जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तत्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, विदर्भातील सर्व 11 ही जिल्ह्यात ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावी आदी मागण्याही करण्यात येणार आहेत.


Share News

copylock

Post Top Advertisement

-->