दि.०३.०३.२०२३
वरिष्ठांनी दिलेली शाब्बासकीची थाप प्रेरणादायी ठरली: डॉ. रश्मी बंड
विद्यापीठाचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी डॉ.बंड यांचं नाव आवर्जून लिहिल्या जाईल; डॉ.प्रशांत बोकारे
सेवानिवृत्त प्रा. डॉ.रश्मी बंड यांना निरोप
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : तीन वर्ष, पाच महिने विद्यापीठाच्या इतिहास विभागात विभाग प्रमुख म्हणून काम केले. काम करीत असतांना सहकारी वर्गाची मोठी मदत झाली. अडचणी येतात त्यावर आपणच उपाय शोधले पाहिजे कामाच्या बाबतीत वरिष्ठांनी दिलेली शाबासकीची थाप नेहमी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. सगळ्यांच्या सहकार्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास सोयीचा झाला असे भावोद्गगार इतिहास विभाग प्रमुख डॉ. रश्मी बंड यांनी काढले.
पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या वतीने नूकताच त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे,प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, संचालक परिक्षा व मुल्यमापन डॉ.अनिल चिताडे तसेच रश्मी बंड यांचे यजमान राजेश बंड आदी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, सगळ्यांचे भरभरून बोलणं हे बँड मॅडमच्या कामाची पावती आहे. प्रवेश समितीमध्ये त्यांनी केलेले काम अतिशय कौतुकास्पद आहे.ज्यावेळी विद्यापीठाचा इतिहास लिहिल्या जाईल त्यावेळी बंड मॅडमच्या कामाचा आवर्जून उल्लेख केल्या जाईल. पुढच्या तीन वर्षांत विद्यापीठ एका नवीन वास्तूमध्ये शिफ्ट होईल आणि पाच हजार विद्यार्थ्यांचे रेसिडेन्शियल विद्यापीठ होईल असा संकल्प यावेळी करूया असे ते म्हणाले.
यावेळी डॉ.रश्मी बंड यांचा त्यांच्या यजमानांसह मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना ,विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि इतिहास विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ उत्तमचंद कांबळे, डॉ नंदकिशोर मने, डॉ. नरेश मडावी, डॉ. धनराज पाटील, डॉ.प्रशांत सोनवणे,डॉ. अरूधंती निनावे , शिल्पा आठवले ,मिश्रा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. संतोष सुरडकर यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील आणि गोंडवाना विद्यापीठातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एम. ए.इतिहास विषयासाठी सुवर्णपदक डॉ. रश्मी बंड यांनी त्यांच्या आईच्या नावाने तिन वर्षा पासून सुरु आहे. तसेच त्या सिनेट सदस्य आहेत.
गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागातून निवृत्त होणाऱ्या त्या पहिल्या प्राध्यापीका आहेत.