Elon Musk :X 'एक्स' देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार; इलॉन मस्कची मोठी घोषणा - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Elon Musk :X 'एक्स' देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार; इलॉन मस्कची मोठी घोषणा

दि. 31.08.2023

MEDIA VNI

Elon Musk :X 'एक्स' देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार; इलॉन मस्कची मोठी घोषणा

मीडिया वी.एन.आय :

X New Features : इलॉन मस्कने आज एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. मस्कने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत पोस्ट केली आहे.

फोन नंबरची गरज नाही

विशेष म्हणजे, एक्स अकाउंटच्या माध्यमातून हे ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स होत असल्यामुळे; समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असण्याची गरज नाही. म्हणजेच यूजर्स आता आपला नंबर शेअर न करताही एखाद्याशी फोनवर बोलू शकणार आहेत.

एक्स ठरणार 'ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक'

आयफोन, अँड्रॉईड, अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे 'एक्स' हे एकप्रकारे ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक ठरेल, असं इलॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला देणार टक्कर

या फीचरमुळे आता एक्स हे थेट मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देऊ शकतं. विशेष म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करण्यासाठी आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असणं आवश्यक आहे. एक्सवर कॉल करताना याची आवश्यकता नसल्यामुळे लोक याचा अधिक वापर करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मेटाने थ्रेड्स नावाचं अ‍ॅप लाँच करून 'एक्स'ला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, थ्रेड्सची हवा काही दिवसांतच कमी झाली. यानंतर आता इलॉनने एक्समध्ये फीचरची घोषणा करून मार्क झुकेरबर्गवर डाव टाकला आहे. त्यामुळे आता मेटा याला कसं प्रत्युत्तर देतंं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->