दि. 30.08.2023
MEDIA VNI
जेथे होते कंडक्टर तेथेच पोहचले सुपरस्टार रजनीकांत; सर्वजण झाले चकित.!
मीडिया वी.एन.आय :
बंगळूर : सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे हा चित्रपट सुपरहिट होत असताना रजनीकांत यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
रजनीकांत अर्थात शिवाजी राव गायकवाड यांनी मंगळवारी बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) बस स्टँडला भेट देत दिली. याच शहरात एकेकाळी ते बस कंडक्टर म्हणून काम करत होते. याठिकाणी भेट देत त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. जयनगर येथील बसस्थानकावर BMTC ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचार्यांसोबत आनंदाने काही क्षण घालवले. यावेळी त्यांनी येथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. याशिवाय त्यांच्यासोबत फोटो देखील काढले.
रजनीकांत यांचा बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बस स्टँडला भेट दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रजनीकांत अनेकदा बंगळुरुला आल्यावर आपल्या जुन्या मित्रांची भेट घेतात.
दरम्यान, रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आज (दि. 10 ऑगस्टला) थिएटरमध्ये दाखल झाला, रजनीकांत यांनी जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. सध्या सगळीकडेच याच चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
VIDEO | Actor @rajinikanth interacted with bus drivers and conductors at BMTC bus depot in Jayanagar, Bengaluru earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) August 29, 2023
(Source: Third Party) pic.twitter.com/BSdWZkFxiC