वनविभाग भरती : अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज, १५ लाखांचा दर, पेपरफुटीचे नागपूर कनेक्शन.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

वनविभाग भरती : अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज, १५ लाखांचा दर, पेपरफुटीचे नागपूर कनेक्शन.!

दि. ०२.०८.२०२३

MEDIA VNI

वनविभाग भरती : अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज, १५ लाखांचा दर, पेपरफुटीचे नागपूर कनेक्शन.!

छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी वनसंरक्षक भरती परीक्षेत उमेदवारांना चिकलठाण्यातील शिवराणा करियर अकॅडमीमधून उत्तरे पुरवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मीडिया वी. एन.आय :

नागपूर : छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी वनसंरक्षक भरती परीक्षेत उमेदवारांना चिकलठाण्यातील शिवराणा करियर अकॅडमीमधून उत्तरे पुरवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी परीक्षा संपण्याच्या दहा मिनिटे आधीच छापा टाकला असता तेथून परीक्षार्थींना इंटरनेट, पुस्तकांतून उत्तरे शोधून सांगितली जात होती. पोलीस आल्याची कुणकुण लागताच चौघे पळून गेले. एकाला पोलिसांनी पकडले. विनोद डोभाळ (रा. दरेगाव) असे त्याचे नाव आहे.

परीक्षा घोटाळ्यातील कुख्यात गुन्हेगार व अकॅडमीचा संचालक सचिन गोमलाडू ऊर्फ राजपूत याच्यासह लोधवाड व अन्य दोघे पळून गेले. एका उमेदवाराकडून १५ लाख रुपये घेऊन परीक्षा केंद्रच मॅनेज करण्यात आले होते. जप्त एका मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपला उपसरपंच सचिन कारोळ या नावावरून पेपरचे १११ फोटो प्राप्त झाले. हे नागपूरच्या एका परीक्षार्थीने पाठवलेले फोटो आढळले. एका फोटोवर पेनने उत्तरे परीक्षार्थींना दिल्याची कबुली डोभाळने दिली. शनिवारी त्याने राजपूतसोबत पार्टी केली. त्याने डोभाळला उत्तरे देण्यासाठी ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. या प्रकारामुळे राज्यभरातील विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->