सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी, महाराष्ट्र शासनासकडून 11 हजार पदांची बंपर भरती जाहीर... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी, महाराष्ट्र शासनासकडून 11 हजार पदांची बंपर भरती जाहीर...

28 ऑगस्ट 2023 

MEDIA VNI

Government Job | सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी, महाराष्ट्र शासनासकडून 11 हजार पदांची बंपर भरती जाहीर

मीडिया वी.एन.आय :

मुंबई : आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, अशी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची इच्छा आहे. अनेक विद्यार्थी वर्षोनुवर्षे सरकारी नोकरीसाठी अभ्यास करतात. हे विद्यार्थी नोकरीसाठी योग्य भरतीची प्रतिक्षा करतात.

त्यानंतर भरती जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करुन नोकरी मिळवतात. राज्यात कोरोना संकट काळात दोन वर्ष कोणतीही भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. पण कोरोना संकटानंतर सातत्याने वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरी जाहीर होत आहे. आतादेखील अशी भरती जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी गृह विभागाकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. नंतर वन विभागाकडून वन संरक्षक आणि मसहूल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. तलाठी भरतीच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. राज्यात सध्या तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. स्वत: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून नेमकी घोषणा काय?

राज्यात उद्यापासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आरोग्य विभागात आता बंपर भरती होणार आहे. तब्बल 11 हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->