दि. 27.08.2023
MEDIA VNI
AI 'एआय'च्या नैतिक वापरासाठी जागतिक आराखडा तयार करा; - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
PM Narendra Modi :
मीडिया वी.एन.आय :
दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयच्या नैतिक वापरासाठी जागतिक पातळीवर एक आराखडा तयार करण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
त्यांनी एआय तंत्रज्ञानातील पक्षपातीपणा आणि त्याच्या समाजावरील पडणार्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. जी-20 परिषदेच्या काही दिवस अगोदर नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीही जोरदार भूमिका मांडली. ते सीआयआयने आयोजित केलेल्या बी-20 परिषदेला संबोधित करीत होते. भारत ग्रीन क्रेडिटसाठी जागतिक आराखडा तयार करीत आहे, असे सांगताना उद्योगातील नेत्यांनी सकारात्मक कृतींवर भर देऊन त्या प्रमाणे जीवन व व्यवसाय करावा, असे आवाहन (PM Narendra Modi) त्यांनी केले.
वातावरण बदल, ऊर्जा क्षेत्रातील संकट, अन्न पुरवठा श्रृंखलेतील बिघडलेले संतुलन, पाणी पुरवठा यासारख्या चिंताजनक मुद्यांवर प्रकाश टाकताना त्यांनी, अशा प्रकारच्या बाबींचा व्यवसायावर परिणाम होतो आणि त्यांचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. आता क्रिप्टो करन्सीशी संबंधित आव्हान निर्माण झाले आहे. यासाठी आणखी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. यासाठी जागतिक पातळीवर आराखडा तयार करावा, असे मला वाटते. त्यात सर्व भागीदारांची काळजी घेण्यात यावी, असे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील तसेच विदेशी व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना सांगितले.
नैतिक विचारांची आवश्यकता
अशाच प्रकारचा दृष्टिकोन कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतही आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. आज जग एआयबाबत खूप उत्साह दाखवत आहे. मात्र, उत्साहासोबतच काही नैतिक विचारही आवश्यक आहेत. कौशल्ये आणि फेरकौशल्यांबाबत अल्गोरिदममधील पक्षपातीपणा आणि त्याच्या समाजावरील परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारचे मुद्दे एकत्रितपणे सोडवावे लागणार आहे, असे (PM Narendra Modi) मोदी यांनी सांगितले.