आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या नेमकं होणार तरी काय? - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या नेमकं होणार तरी काय?

दि. 07.08.2023

MEDIA VNI

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या नेमकं होणार तरी काय?

मीडिया वी.एन.आय : 

नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक (Internet Use) आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आकडेवारी देशात 1.2 अब्ज मोबाईल फोन आहेत. त्यापैकी सुमारे 750 दशलक्ष स्मार्टफोन आहेत.

देशातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त वापरकर्ते त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात.

भारत हा जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक (Internet Use) आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आकडेवारी देशात 1.2 अब्ज मोबाईल फोन आहेत. त्यापैकी सुमारे 750 दशलक्ष स्मार्टफोन आहेत. देशातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त वापरकर्ते त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात. इंटरनेटशिवाय लोकांचे पान देखील हालत नाही.

तासन् तास लोक सोशल मीडियावर घालवतात. मात्र, आता लवकरच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय लाइव्ह टिव्ही आणि चित्रपट पाहता येणार आहेत. त्याकरता एक नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही. डायरेक्ट-टू-मोबाईल म्हणजेच डी2एम ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञानाद्वारे दूरसंचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच आयआयटी कानपूर या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होऊ शकते. या बैठकीनंतर या प्रकरणी अंतिम निर्णयही येऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्ट म्हणजे व्हिडिओ आणि इतर मल्टिमीडिया थेट तुमच्या मोबाईलवर प्रसारित करणे किंवा ब्रॉडकास्ट करणे. इंटरनेट, केबल किंवा डीटीएचशिवाय तुम्हाला बातम्या, क्रिकेट इत्यादींचे थेट मोबाईल फोनवर व्हिडिओ प्रसारण करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच, चित्रपटांपासून ते टॉप ओटीटी ऍप्स आणि इतर मल्टीमीडिया इंटरनेटशिवाय थेट तुमच्या फोनवर प्रसारित केली जाऊ शकते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->