गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन होणार उत्साहात साजरा तसेच करण्यात येणार विविध पुरस्काराचे वितरण - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन होणार उत्साहात साजरा तसेच करण्यात येणार विविध पुरस्काराचे वितरण

दि. 30.09.2023
MEDIA VNI 
गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन होणार उत्साहात साजरा तसेच करण्यात येणार विविध पुरस्काराचे वितरण
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : दि. 27 सप्टेंबर 2011 रोजी महाराष्ट्र शासनाने गोंडवाना विद्यापीठाची अधिसूचना काढली असून 2 ऑक्टोंबर 2011 रोजी विद्यापीठाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. म्हणून 2 ऑक्टोंबर 2011 हा दिवस विद्यापीठाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यापीठ 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत 13 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने विविध पुरस्काराचे वितरण तसेच परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सोमवार दि. 2 ऑक्टोंबर 2023 दुपारी 12 वाजता, महाराजा सेलिब्रेशन हॉल अँड लॉन माडिया तुकूम, धानोरा रोड सिटी हार्ट हॉटेल जवळ, गडचिरोली येथे तसेच परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज इमारतीचा लोकार्पण सोहळा गोंडवाना विद्यापीठ येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील मुख्य अतिथी अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य धर्मरावबाबा आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीना प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदी उपस्थित राहणार आहे.
''मेरी माटी मेरा देश'' या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांना सुपूर्द करण्यात येणार अमृत कलश 
"मेरी माटी मेरा देश" या उपक्रमाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करायची असल्यामुळे सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गोंडवाना विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयानी "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमांतर्गत  जमा केलेल्या मातीचा अमृत कलश गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.

जीवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराचे वितरण तसेच विद्यापीठ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
◆  जीवनसाधना गौरव पुरस्कार
आम्ही आमच्या आरोग्यासाठी तथा सामाजिक कार्यकर्ता, कुरखेडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली संयोजक डॉ. सतिश वसंतराव गोगुलवार,

उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार
छत्रपती नगर, तुकूम, चंद्रपूर जि. चंद्रपूर,अधिसभा सदस्य संजय बलवंतराव रामगीरवार

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
निलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती,

उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, डॉ. प्रमोद मुर्लीधर काटकर,

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय)
आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) ता. वडसा जि. गडचिरोली , सहयोगी प्राध्यापक, डॉ. हितेंद्र धोटे,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ३ (विद्यापीठ)
निम्नश्रेणी लिपीक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,  भिमराव ज्योतिराव उराडे,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ३ (महाविद्यालय)
प्रयोगशाळा सहाय्यक जनता महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, प्रशांत बाजीराव रंदई,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ४ (महाविद्यालय)
प्रयोगशाळा परिचर जनता महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, योगिता प्रकाश रायपुरे,

उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर, अभिजित किसन अष्टकार,

उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार
गोविंदराव मूनघाटे कला व विज्ञान महाविद्याल, कुरखेडा ता. कुरखेडा जि.गडचिरोली, डिंपल रमेश बोरकर

◆ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार,  कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक यांचा शाल, श्रीफळ तसेच विद्यापीठाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, प्राचार्य ,केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी डॉ.हिराजी बनपूरकर तसेच वार्षिकांक स्पर्धे मध्ये प्राविण्य प्राप्त महाविद्यालयाना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->