दि. 05 सप्टेंबर 2023
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागातर्फे केमिकल सोसायटीची स्थापना
मीडिया वी.एन.आय:
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक रसायनशास्त्र विभागातर्फे आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने केमिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रसायनशास्त्र विभागाचे समन्वयक सा. प्रा. शिवाजी चेपटे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सा. प्रा. मिथुन शेंडे, सा.प्रा.ज्ञानदेव घाटे, सा. प्रा. रवींद्र बुरसे उपस्थित होते. अध्यक्षीय स्थाना वरून बोलताना शिवाजी चेपटे यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनावर जास्त भर द्यावा असे मत व्यक्त केले. केमिकल सोसायटीचा उद्देश म्हणजे शोध आणि निरीक्षणांचा संवाद आणि चर्चा होय. केमिकल सोसायटीची स्थापना करून विद्यार्थ्यांची या प्रमाणे समिती गठित करण्यात आली अध्यक्ष- पल्लवी कांबळी उपाध्यक्ष- साहिल बोबडे सचिव- गौरी कलाने, कोषाध्यक्ष- आकांक्षा उईके, कृणाल मस्के या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिथुन शेंडे यांनी केले.
व आभार गोपाल कोठारे या विद्यार्थ्याने मानले.