दि. 13.09.2023
MEDIA VNI
पदवीधरांना कृषी विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर...
- पदवीधरांना कृषी विभागात नोकरीची मोठी संधी! कृषी सेवक पदाच्या २०७० जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Krushi Sevak Bharti 2023:
मीडिया वी.एन.आय :
महाराष्ट्र कृषी विभागाने “कृषी सेवक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कृषी विभाग भरती २०२३.
विभागाचे नाव – कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य.
पदाचे नाव – कृषी सेवक.
एकूण रिक्त पदे – २०७०.
शहरानुसार पदसंख्या –
लातूर – १७०, पुणे -१८८ पदे,औरंगाबाद – १९६, अमरावती – २२७, कोल्हापूर – २५०, ठाणे – २५५ नाशिक – ३३६ पदे, नागपूर – ४४८
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
हेही वाचा- पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक
शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.
अधिकृत बेवसाईट –
https://krishi.maharashtra.gov.in/
वयोमर्यादा –
- सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
- मागास प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे.
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – १००० रुपये.
- मागासवर्गीय – ९०० रुपये.
पगार – उमेदवारांना महिना १६ हजार पगार मिळणार आहे.
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी
https://drive.google.com/file/d/1ZynXAim1Q8RY7k3W9yvS9Z83awRPO4cG/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.