दि. 26.09.2023
MEDIA VNI
जिवंत जाळत होते वधू-वर, लोक वाजवत होते टाळ्या, कारण जाणून तुम्हाला ही बसेल धक्का.!
मीडिया वी.एन.आय :
मुंबई : हल्ली लग्नात ग्रँड एन्ट्रीचा क्रेज वाढतच चालला आहे. प्रत्येक नववधू आणि नवरदेवाला वाटत असतं की त्यांची लग्नातील एन्ट्री अशी व्हावी की सगळे पहाताच रहावे. तसेच ती सर्वांच्या लक्षात रहावी. यासाठी लोक खूप विचार करुन गाण्याची निवड करतात.
कधी ही एन्ट्री जेसीबीवर होते. तर कधी बाईकवर, तर कधी आकाशातून पाळण्यावर. तुम्ही यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असणार. ही अशी एन्ट्री पाहायला खूप भारी वाटते. पण कधीकधी ते जीवघेणं देखील ठरते. लग्नातील एन्ट्री फेल झाल्याचे तुम्ही अनेक व्हिडीओ ही पाहिले असणार.
सध्या अशाच लग्नातील नवरा-नवरीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल आणि काही वेळासाठी हृदयाचा ठोका देखील चुकेल. कारण तसंच काहीसं या व्हिडीओत घडलं आहे.
खरंतर आपल्या अंगाला मुद्दाम आग लावून नवरा आणि नवरीने आपल्या लग्नात एन्ट्री घेतली. त्यांनी आपल्या लग्नाच्या कपड्यांना आग लावली होती. हा त्यांचा एक स्टंट होता. जे पाहून जमलेले नातेवाईक आश्चर्यचकीतपणे पाहात होतो आणि टाळ्या वाजवत होते. आपली लग्नातील एन्ट्री हटके व्हावी आणि ती सर्वांच्या लक्षात रहावी या फक्त एका कारणामुळे या नववधू आणि नवरदेवाने स्वत:ला आग लावून घेतली.
स्वत:ला आग लावून घेतल्यानंतर नववधू आणि नवरदेव एकमेकांचा हात पकडून लोकांमधून धावत आले. ज्याचा व्हिडीओ काढला गेला. ज्यानंतर आग विझवण्याच्या केमिकलचा वापर करुन या दोघांच्याही अंगाला लागलेली आग विझवली गेली. नशीबाने ही आग विझली आणि दोघांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही.
##
#Bride and groom set fire to their costumes during the ceremony pic.twitter.com/B564d7pgcM
— CCTV IDIOTS (@cctvidiots) September 24, 2023
हा व्हिडीओ X वर @cctvidiots नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला 1.5 मीलीयनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. लोकांनी या व्हिडीओला वारंवार पाहिलं आहे, तसेच यावर कमेंट देखील केल्या आहेत.
हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधी काढला गेलेला आहे याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काही लोक हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगत आहेत. पण आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशळ मीडियावर ट्रेंड होत आहे.