गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ च्या निकालाची टक्केवारी ७५.२६ टक्के - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ च्या निकालाची टक्केवारी ७५.२६ टक्के

दि. 25.09.2023
MEDIA VNI
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ च्या निकालाची टक्केवारी ७५.२६ टक्के
- अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाने लागू केली कॅरी फारवर्ड पध्दत
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा निकाल धक्कादायक या मथळयाखाली विविध वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित झाली होती. सदर बातमीमध्ये २०२३ मध्ये विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले. यात ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण तर केवळ २२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २९ टक्के तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ७१ टक्के आहे. या आशयाचे वृत्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरूदास कामडी यांच्या प्रेसनोटवरून विविध वृत्तपत्रांनी प्रकाशित केले. चुकीचे वृत्त प्रकाशित करून विद्यार्थी, पालक यांच्यात सभ्रंम निर्माण होवून विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे.
सदर वृत्त पूर्णतः निराधार असून उन्हाळी २०२३ मध्ये एकुण परीक्षेला बसलेले विद्यार्थी ७५ हजार असून त्यापैकी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ५६,४४४ आहेत तर अनुतीर्ण विद्यार्थी १८,५५६ आहेत. गोंडवाना विद्यापीठाची निकालाची टक्केवारी ७५.२६ टक्के इतकी आहे.
विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२३ च्या परीक्षेत १८,५५६ अनुत्तीर्ण झाले होते. विद्यार्थ्यांना त्यामुळे पदवी व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागणार होते. पदवी व उच्चशिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढून अनेक महाविद्यालय विद्यार्थ्यांवीना ओस पडणार होती. विद्यार्थी विना महाविद्यालय अशी गंभीर समस्या निर्माण झालेली होती. त्यामुळे विद्यापीठाने सत्र २०२३-२४ करिता कॅरी फारवर्ड पध्दती लागू करून सदर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेशाकरिता संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या आशयाचे परिपत्रक गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर २१ सप्टेंबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाने सत्र २०२३-२४ करिता कॅरी फारवर्ड पध्दत लागू करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे एकही विद्यार्थी पुढील सत्रात प्रवेशापासून वंचित राहणार नाही.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->