दि. 24.09.2023
MEDIA VNI
ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणाकरिता पात्र विद्यार्थी इंग्लिश स्पीकिंग कोर्स करीता नागपूरला झाले रवाना
- लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयरन ओर माइंस तर्फे
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, डोगराड, नक्षलग्रस्त, आदिवासी अविकसित म्हणून ओळखले जातो. एटापल्ली तालुकायातील अतिदुर्गम आदिवासी युवक- युवतीना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स, लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनचे वतीने ऑस्ट्रेलिया ला माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांना इंग्रजी सुरळीत बोलता यावे. यासाठी नागपुर येथे इंग्रजी स्पीकींग कोर्सचे शिक्षण घेण्याकरिता पाठविण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांचे नागपुरातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांना एडवांस कोर्स घेण्याकरिता दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.
दोन्ही कोर्सेस पुर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्याकरिता ऑस्ट्रेलिया ला पाठविण्यात येणार आहे. नागपुराला पाठवित असतांना विद्यार्थ्यांचे पालक व लॉयड्स मेटल्सचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना एटापल्ली वरुन नागपुरकरिता रवाना करण्यात आले.
Students eligible for mining engineering education in Australia left for Nagpur for English speaking course By Lloyds Metals and Energy Limited Surjagad