गोंडवाना विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे आयोजन - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गोंडवाना विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे आयोजन

दि. 15 ऑक्टोंबर 2023 
MEDIA VNI 
गोंडवाना विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे आयोजन
- दक्षिणात्य सिनेअभिनेत्री तथा मॉडेल अलिशा मनाली (माजी विद्यार्थीनी गोंडवाना विद्यापीठ) कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे आयोजन विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक १७ ऑक्टोंबर ला सुमानंद सभागृह, आरमोरी रोड,गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता  होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, उद्घाटक म्हणून दक्षिणात्य सिनेअभिनेत्री तथा मॉडेल अलिशा मनाली (गोंडवाना विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी),
प्रमुख अतिथी म्हणून प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण,
आयोजक संचालक(प्र.) विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम आदी उपस्थित  राहतील. 
हा महोत्सव १७ ते १९ ऑक्टोबर असा तीन दिवसीय  चालणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवाला उदघाटना नंतर लगेचच सुरुवात होणार असून यात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, मूकनाट्य, नकला, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत ,समूहगीत, शास्त्रीय तालवाद्य ,संगीत शास्त्रीय ताण वाद्य ,पाश्चिमात्य गायन ,लोकसंगीत वाद्यवृंद, वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, स्थळ चित्र,पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र, माती कला, चिकट कला, एकांकिका, प्रहसन, शॉर्ट फिल्म,स्पॉट फोटोग्राफी या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयाचे जवळपास ७००विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या इंद्रधनुष्य महोत्सवाचा समारोप १९ ऑक्टोबरला होणार आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रिया गेडाम यांनी केले यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->